fighting between bar girls in ulhasnagar
fighting between bar girls in ulhasnagar 
मुंबई

उल्हासनगरात ज्यादा पैसे कमावण्याच्या वादातून बारबालांत दे-दणादण

दिनेश गोगी

उल्हासनगर - ऑर्केसस्ट्रा बारच्या नावाखाली अश्लीलतेचे हावभाव करून गिऱ्हाइकांना आकर्षित करणाऱ्या बारबालांत ज्यादा पैसे कमावण्याच्या वादातून चक्क दे-दणादण देण्याची धक्कादायक घटना गुरुवारच्या मध्यरात्री उल्हासनगरातील श्रीराम चौकात घडली आहे. यापूर्वी देखील याच चौकात गिऱ्हाइकांमध्ये वादविवादाच्या घटना घडल्याने श्रीरामांच्या नावावर असलेला चौकच असुरक्षित झाला आहे.

आतापर्यंत बारबाला वरुन गिऱ्हाईकांचे हाणामारीच्या-तुतूमैमैच्या घटना घडल्या आहेत. मात्र कालच्या घटनेने पैसे कमावण्या वरून बारबालांतच दे-दणादणचा प्रकार उद्भवल्याने उल्हासनगरात हा चर्चेचा विषय बनला आहे. श्रीराम चौक परिसरात एखाद दोन नाही तर तब्बल पाच ऑर्केस्ट्रा बार आहेत. त्यापैकी ऐंजल नामक बारमध्ये काम करणाऱ्या बार मध्ये एक बारबाला ज्यादा पैसे कमवते म्हणून दुसऱ्या बारबालाने आपल्या मैत्रीणीसह श्रीराम चौकात गोंधळ घालत तिला मारहाण केली. एक तास भर चौकात सुरु असलेला गोंधळाची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून 4 बारबालांना ताब्यात घेतले. सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालण्याचा गुन्हा दाखल करून त्यांच्या कडून दंडात्मक रकम आकारून त्यांना सोडून देण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT