मुंबई

मुंबईच्या 5 स्टार हॉटेलमध्ये अभिनेत्रीला अटक

सांताक्रूझ पोलिसांनी जुहू येथील हॉटेलवर छापा मारून केली कारवाई

सकाळ वृत्तसेवा

सांताक्रूझ पोलिसांनी जुहू येथील हॉटेलवर छापा मारून केली कारवाई

मुंबई: काही दिवसांपूर्वी ठाण्यातील (Thane) एका खाजगी इमारतीत ठाणे गुन्हे शाखेने (Crime Branch) छापा (Raid) टाकून एका सेक्स रॅकेटचा (Sex Racket) पर्दाफाश केला होता. यात महत्वाची बाब म्हणजे अटक केलेल्यांमध्ये दोन महिला या दाक्षिणात्य अभिनेत्री होत्या. चित्रपट व मालिकांचे शूटिंग बंद असल्याने शरीरविक्रय करून त्या पैसे कमवत असल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर आज (सोमवारी) मुंबईतील सांताक्रुझमध्ये एका दाक्षिणात्य अभिनेत्रीला अटक करण्यात आली. तेलगु चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीला सांताक्रुझ पोलिसांकडून अटक करण्यात आली. एक 5 स्टार हॉटेलमध्ये ड्रग्ससेवन करताना तिला रंगेहाथ पकडल्यानंतर अटक केली गेली. (Film Actress arrested from Mumbai 5 Star Hotel for consuming Charas Drugs)

मिळालेल्या माहितीनुसार, तेलगु चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आणि तिचा मित्र दोघे सांताक्रुझच्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. तेथे असताना रविवारी रात्री त्यांनी चरस ड्रग्सचे सेवन केले. पहाटेपर्यंत त्यांची ही वाढदिवसाची पार्टी सुरूच होती. पहाटेच्या वेळी सांताक्रूझ पोलिसांनी जुहू परिसरातील 5 स्टार हॉटेलवर छापा माराल आणि कारवाई केली. या कारवाईत ती अभिनेत्री ड्रग्जसेवन करताना आढळून आली. एका वाढदिवसाच्या पार्टीला ही अभिनेत्री तेथे आली होती. या पार्टीत ती आणि तिचा मित्र ड्रग्ससेवन करत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली आणि त्यांच्यावर गुन्हा नोंदवला. या प्रकरणी त्यांना वांद्रे कोर्टात हजर करण्यात आल्यावर त्यांना जामिनावर सोडून देण्यात आले.

(संपादन- विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja: हिंदु-मुस्लिम ऐक्याचा संदेश! लालबागचा राजा मशिदीजवळ पोहोचतो तेव्हा...; पाहा ऐतिहासिक क्षणाचा खास व्हिडिओ

Ganpati Visarjan 2025 Live Updates : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीच्या दिशेने पुढे जातोय

उत्साहाला गालबोट! पुण्यात ४ तर शहापूरमध्ये ५ जणांचा मृत्यू, कोल्हापूरसह सांगलीत मिरवणुकीत वाद... विसर्जनादरम्यान कुठं काय घडलं?

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

SCROLL FOR NEXT