vajreshwari
vajreshwari 
मुंबई

अखेर गणेशपुरी तीर्थक्षेत्रातील रस्ते होणार सिमेंटचे

सकाळवृत्तसेवा

वज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील नामांकित असलेले व वज्रेश्वरी देवी व नित्यानंद स्वामींच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वज्रेश्वरी, गणेशपुरी या तीर्थक्षेत्रामधील अंतर्गत रस्ते गेल्या कित्येक वर्षे पासून अतिशय खराब होते. दुर्लक्षित करण्यात आले होते. मात्र खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नने एम.एम.आर.डी.ए. मधून 13 कोटी 96 लाख रुपये मंजूर करून येथील भिवाळी, गणेशपुरी, वज्रेश्वरी व अकलोली या अंतर्गत रस्त्याचे आज भूमिपूजन करण्यात आले.

गणेशपुरी येथील शिवाजी चौक ते नित्यानंद महाराज समाधी मंदिर हा रस्ता गेली कित्येक वर्षांपासून खड्डेमय व दुरावस्थेत होता. त्यामुळे येथे येनाऱ्या भाविकांना खूप हालअपेष्टा करून येथील विविध सण, व बाबांचे कार्यक्रम साजरे करीत होते, त्यातच बाबांचे गुजरात (अहमदाबाद) येथील स्वामी नित्यानंदाचे निस्सीम भक्त गोविंद परमार हे या समस्ये ला वैतागून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावास भेटून व त्यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना ही बाब लक्षात आणून खासदार मार्फत गणेशपुरी येथील तसेच वज्रेश्वरी, अकलोली या परिसरातील रस्ते समस्या कायम स्वरूपी मिटवण्यासाठी सिमेंट रस्ते एम. एम. आर. डी. ए. च्या माध्यमातून मंजूर करून दिले, आज या रसत्याचे उदघाटन येथील शिवाजी चौक या ठिकाणी भिवंडी लोकसभे चे खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी भाजपचे येथील पदाधिकारी जगनाथ पाटील, शांताराम पाटील, उप सरपंच विनोद पाटील, पी के म्हत्रे, सुभाष पाटील, किशोर पाटील, पंचायत समितीचे सभापती रविना जाधव, रवी जाधव गणेशपुरीचे सरपंच गोवर्धन भोईर, रामचारण नाईक, दिनेश पाटील, नारायण पाटील आदी सह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 

दरम्यान यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पाटील यांनी येथील तीर्थक्षेत्र साठी लवकरच पाणी फिल्टर प्लांट, व येथील तीर्थक्षेत्र ब वर्गात घेणार असल्याचे सांगून या परिसराच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले
.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT