मुंबई

बालमृत्यूवर तातडीने उपाय शोधा! आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत 

सकाळवृत्तसेवा

मोखाडा : मोखाडा तालुक्‍यात नऊ महिन्यांत 20 बालकांचा मृत्यू झाल्याचा प्रकार "सकाळ'ने समोर आणल्यानंतर राज्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी तातडीने मोखाड्याचा दौरा करत कुपोषणाचा बळी ठरलेल्या मुलांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, तसेच पोषण आहार आणि अंगणवाडी सेविकांना मिळणाऱ्या मानधनासाठी होणारा विलंब यावर तात्काळ मार्ग काढण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 

मोखाड्यात नऊ महिन्यांत 20 बालमृत्यू झाल्याची बातमी "सकाळ'ने "मोखाड्यात कोवळी पानगळ थांबेना' या मथळ्याखाली प्रसिद्ध केली होती. त्याची तातडीने दखल घेत आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मोखाडा ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट दिली. तेथे त्यांनी आरोग्य आणि एकात्मिक बाल विकासचे अधिकारी यांची बैठक घेत बालमृत्यूबाबत माहिती व कारणे जाणून घेतली. यावेळी त्यांनी रुग्णांची आणि उपचार केंद्रातील बालकांची पाहणी करीत त्यांच्याशी संवाद साधला. 

यावेळी त्यांनी पोशेरा रड्याचापाडा येथे जुलै महिन्यात मृत्यू झालेल्या ज्योती हिरामण भोवर या बालिकेच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी किशोरवयीन मुली, गरोदरमाता, बालविवाह यासंदर्भात ठोस उपाययोजना राबवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत मोखाडा पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ, आरोग्य उपसंचालक डॉ. गौरी राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी दयानंद सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक कांचन वानेरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. 

बालमृत्यू शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न 
रोजगारासाठी होणारे स्थलांतर, बालविवाह, किशोरवयीन मुलींची घ्यावयाची काळजी, यासाठी असलेल्या योजनांबरोबरच नव्याने कुपोषण निर्मूलनासाठी योजना तयार करण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने स्थलांतर रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील. मोखाड्यात गेल्या काही महिन्यांत बालमृत्यूचा आकडा शून्यावर आला होता. मात्र जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बालमृत्यू शून्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याचे सावंत यांनी यावेळी सांगितले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT