ccd
ccd 
मुंबई

ठाण्यात नववर्षात आगीचे सत्र सुरूच 

दीपक शेलार

ठाणे : नववर्षात ठाण्यात आगीचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी (ता. 4) सकाळी हरिनिवास परिसरातील खाऊगल्लीतील एका आलिशान कॅफे शॉपला अचानक आग लागल्याची घटना घडली. ठाणे अग्निशमन दल व ठाणे मनपा आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तातडीने आगीवर नियंत्रण मिळवल्याने सुदैवाने मोठी हानी टळली. कॅफेमधील संगणक विभागात शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी. असा प्राथमिक अंदाज दुकान मालकांनी वर्तविला. 

ठाण्यातील हरीनिवास सर्कल नजीक प्रसिद्ध खाऊ गल्ली आहे.या गल्लीत विविध ब्रॅडसची अनेक खादयपेयांची दुकाने आहेत.येथील आंकाक्षा अपार्टमेंटच्या तळमजल्यावर राजेश जाधव यांच्या मालकीच्या दुकानात कॉफी कॅफे डे हे कॅफे शॉप भाड्याने चालवले जाते.या कॅफे शॉपला शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.आगीच्या ज्वाळा पसरण्यापुर्वीच घटनास्थळी अग्निशमन दल आणि ठामपा आपत्कालीन पथकाने धाव घेऊन आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवले.छोटी आग असल्याने सुदैवाने अनुचित प्रकार टळला.अशी माहिती आपत्कालीन कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली.दरम्यान, नववर्षाच्या प्रारंभी 1 जाने.ला 4 आगीच्या घटना घडल्यानंतर आग लागण्याची ही पाचवी घटना आहे.तर,मागील चार दिवसात मोठया व किरकोळ अशा तब्बल 12 आगी लागल्याची माहिती आपत्कालीन कक्षाकडुन देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT