fish market in dombivli local against outside vendors mumbai marathi news Sakal
मुंबई

Mumbai : शुक्रवार खवय्यांसाठी वाराचा दिवस...लगबगीने मासळी बाजार गाठला, पण डोंबिवलीतील मच्छीबाजारात शुकशुकाट

सकाळच्या सुमारास मासे घेण्यासाठी अनेकांनी लगबगीने मासळी बाजार गाठला. पण

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - शुक्रवार खवय्यांसाठी वाराचा दिवस...डोंबिवली पश्चिमेतील मच्छी बाजारात पहाटे पासूनच विक्रेते, ग्राहक यांची लगबग सुरू असते. मात्र शुक्रवारी बाजारात वेगळेच चित्र दिसुन आले. स्थानिक विक्रेत्यांनी बंद पुकारत आज बाजार बंद ठेवला होता. यामुळे विक्रेत्या महिला कधी नव्हे ते हातावर हात टाकून बसलेल्या होत्या.

तर ग्राहक पण बाजाराच्या दारात येऊन बाजार रिकामा बघून इतर ठिकाणी कुठे मच्छी चांगली मिळेल याचा शोध घेत फिरत होते. डोंबिवली बाहेरील मत्स्य विक्रेत्यांविरोधात डोंबिवली मधील स्थानिक महिला मासे विक्रेत्या आक्रमक झाल्या असून आज या मच्छी विक्रेत्यांनी बंद पाळत आपला रोष व्यक्त केला आहे.

आगरी कोळी मच्छी विक्रेता सेवा संस्थेच्या वतीने शुक्रवारी मासळी बाजार बंद ठेवत आंदोलनाची हाक देण्यात आली होती. मासळी विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात या बंद मध्ये सहभागी होत स्थानिक विक्रेत्यांची एकजूट दाखवून दिली.

डोंबिवली पश्चिमेतील उमेश नगर परिसरात भरणारा किरकोळ मासळी बाजार हा उभ्या डोंबिवलीत प्रसिद्ध आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी स्थानिक भूमीपुत्र समाज बांधव मासे विक्रीचा व्यवसाय करत

आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून वसई आणि आसपासच्या परिसरातील स्थानिक मासे विक्रेते डोंबिवलीमध्ये येऊन व्यवसाय करत असल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया या आंदोलनकर्त्या महिलांनी दिली.

तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी डोंबिवलीतील भूमीपुत्र महिलांना सहकार्य करण्याऐवजी वसईहून येणाऱ्या मासे विक्रेत्यांना सहकार्य करत असल्याबद्दलही डोंबिवलीतील मासे विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच आमच्या मागणीची दखल न घेतल्यास आणखी उग्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी महिला मासे विक्रेत्यांच्या संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

दरम्यान आज शुक्रवार असून मांसाहारी खवय्यांचा आवडीचा दिवस. त्यामुळे सकाळच्या सुमारास मासे घेण्यासाठी अनेकांनी लगबगीने मासळी बाजार गाठला. पण तिकडे मच्छी विक्रेत्या महिलांनी आज मासे विक्री बंद ठेवल्याने त्यांचा मोठा हिरमोड झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-LPG Price Today: कच्चे तेल 10% ने घसरले! पेट्रोल-डिझेल, CNG आणि LPG चे नवे दर जाहीर; पाहा तुमच्या शहरातील भाव

Dairy Farmer Success Story: आईच्या वेदनेतून जन्माला आले स्वप्न; एका अनुभवाने बदलले आयुष्य, ५० वर्षांनी बनली यशाची प्रेरणादायी यशाेगाथा..

Latest Live Updates Marathi : विरार-भरूच मेमू ट्रेन रुळावरून घसरली, रेल्वे वाहतूक विस्कळीत

अजय देवगणच्या 'चौहान'मध्ये विक्रांत मेस्सीची दमदार एन्ट्री; साकारणार खलनायकाची भूमिका

Mumbai: अय्यंगार बेकरीवर FDAची धाड! केकमध्ये उंदराची विष्ठा आढळल्याचा व्हिडिओ व्हायरल, दोन मुलींसह नगरसेविका आजारी

SCROLL FOR NEXT