मुंबई

मच्छी मार्केट हलवण्यास विरोध

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महात्मा फुले मार्केट समोरील छत्रपती शिवाजी महाराज मच्छी मार्केटमधील कोळी बांधवांनी आज, गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. येथील मच्छी मार्केट ऐरोली या ठिकाणी हलवण्यात येणार असून याला विरोध करतानाच कोळी महिलांनी राज ठाकरे यांच्याकडे त्यांची कैफियत मांडली.

यावेळी राज ठाकरे यांनी कोळी बांधवांना दिलासा देत मी तुमच्या पाठीशी आहे, असे सांगितले. तसेच मी स्वतः मुंबई महापालिका आयुक्तांना भेटून तुमचा विषय मांडणार आहे. तोपर्यंत कोणीही आले तरी तुम्ही तिथून हलू नका, असे राज ठाकरेंनी कोळी बांधवांना सांगितले.

महात्मा फुले मार्केट समोरील छत्रपती शिवाजी महाराज मच्छी मार्केटमधील कोळी महिलांना महापालिकेच्या वतीने जागा खाली करण्याची नोटिस देण्यात आली आहे. तसेच त्यांना कायम स्वरूपी ऐरोली येथे स्थलांतरीत केले आहे. त्या विरोधात तेथील कोळी महिला, माथाडी कामगार आणि व्यापारी यांचे शिष्टमंडळ आज कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली.

क्रॉफर्ड मार्केट समोरील घाऊक मासळी बाजार असलेल्या शिवाजी महाराज मंडईची इमारत धोकादायक ठरल्याने येथील बाजार आता मानखुर्द-ऐरोली या जकात नाक्याच्या जागेवर हलवला जाणार आहे. महापालिकेच्या या निर्णयाचा तीव्र विरोध आता मच्छिमारी संस्थांकडून होवू लागला आहे. महापालिकेने एक ऑगस्टपर्यंत सकारात्मक कार्यवाही करून पुनर्वसनाचा निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने दिला आहे.

कॉफ्रर्ड मार्केट समोरील घाऊक मासळी बाजार भरल्या जाणार्‍या शिवाजी महाराज मंडईची वास्तू धोकादायक बनल्याने या मंडईतील सर्व मासे विक्रेत्यांचे मानखुर्द-ऐरोली येथील जकात नाक्याच्या जागेवर पुनर्वसन करण्याचा निर्णय महापालिका बाजार विभागाने घेतला आहे. यासंदर्भात मासे विक्रेत्यांना जागा खाली करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

शिवाजी महाराज मंडईची इमारत पाच वर्षांपूर्वी धोकादायक झाल्यानंतर तळ  मजला कायम राखून उर्वरीत मजले तोडण्याचे काम चालू आहे. त्यामुळे या तळ मजल्यावरील जागेत घाऊक मासळी विक्रीचा व्यवसाय करणार्‍यांचे पुनर्वसन क्रॉफर्ड मार्केटमध्ये करण्याची मागणी होत होती. परंतु क्रॉफर्ड मार्केटचा रखडलेला विकास आणि अपुरी पडणारी जागा लक्षात घेता प्रशासनाने हे मच्छिमार्केट मानखुर्दला ऐरोलीच्या जकात नाक्याच्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे मासे विक्रेत्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. याचा निषेध व्यक्त करत रविवारी मंडईच्या जागेत अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या नेतृत्वाखाली सर्व मासळी विक्रेत्यांच्या संस्थांनी तीव्र आंदोलन केले होते. यावेळी कोळी समाजाचे नेते दामोदर तांडेल, भूषण पाटील, माजी महापौर नगरसेवक मिलिंद वैद्य, नयना पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT