मुंबई

मच्छिमार नेते दामोदर तांडेल यांचे 72 व्या निधन

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः मच्छिमारांवरील अन्यायाविरोधात सतत वेगवेगळ्या माध्यमातून लढा देणारे नेते दामोदर तांडेल (वय 72) यांचे आज दुपारी कोरोनामुळे निधन झाले. अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे ते अध्यक्ष होते.  कृती समितीच्या माध्यमातून त्यांनी पत्रके, आंदोलने, मोर्चे, संबंधित मंत्री-सचिव यांच्या भेटीगाठी आदी माध्यमातून मच्छिमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शेवटपर्यंत धडपड केली होती. मच्छिमारांच्या गावठणांचा प्रश्न, डिझेल सबसिडीचा मुद्दा, वादळामुळे नुकसानभरपाईचा प्रश्न, मच्छिमार बंदरे व जेटी, पर्ससीन नेट व एलएडी लाईटने मासेमारी करणाऱ्या मोठ्या ट्रॉलरविरुद्धचा लढा हे मुद्दे त्यांनी सतत पेटते ठेवले होते. 

काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना व दोन नातवंडे असा परिवार आहे. 
 
त्यांचा रोखठोक स्वभाव आणि बैधडक शैलीची कार्यपद्धती यामुळे राजकीय नेते देखील त्यांना वचकून होते. कोकण किनारपट्टीतील ३७५ गावांमधील मच्छीमारांच्या वहिवाटीच्या जमिनी सात-बारा उताऱ्यावर आणणे, मुंबईतील कोळीवाडे व मच्छीमार वसाहतींना तीन चटईक्षेत्र निर्देशांक व ३३ फुटांच्या पक्क्या बांधकामांना परवानगी मिळणे यासाठी त्यांनी अथक पाठपुरावा केला. मत्स्य विकास महामंडळ, राष्ट्रीय मत्स्यजीवी सहकारी संघाचे कार्यकारी संचालक तसेच महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष आदी पदेही त्यांनी भूषविली होती. 

अखेरच्या दिवसांतही प्रस्तावित वाढवण बंदराला विरोध करण्यासाठी बंदर विरोधी कृती समितीला पाठींबा देणारे पत्रही त्यांनी मागील आठवड्यात पालघर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमार्फत दिले होते. पालघर जिल्ह्यातील केळवे-सातपाटी मूळ गाव असलेले तांडेल कफ परेड च्या मच्छिमार नगरात रहात होते. हिंदुस्थान लीव्हर मध्ये काम करताना त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी लढे दिले व निवृत्तीनंतर त्यांनी मच्छिमारांच्या हक्कांचा ध्वज खांद्यावर घेतला. त्यांच्या पार्थिवावर चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Fisherman leader Damodar Tandel dies 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Ganesh Naik: आम्हाला प्रेमाने दिलेला आदेश आवडतो, तंबी देणारा जन्मलेला नाही

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT