plaster ceiling collapse sakal
मुंबई

Mumbai Rain Accident : घराचे प्लास्टर कोसळून मुंबईत ५ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबईत मान्सून सुरु झाल्यापासून पडझडीचे सत्र सुरु आहे. आज भांडुप पश्चिम सोनापूर येथील झकारिया इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील घराचे प्लास्टर कोसळले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईत मान्सून सुरु झाल्यापासून पडझडीचे सत्र सुरु आहे. आज भांडुप पश्चिम सोनापूर येथील झकारिया इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील घराचे प्लास्टर कोसळल्याने खाली झोपलेल्या तसीन शेख (५) हिच्या अंगावर पडल्याने डोक्याला गंभीर मार लागला. तिला जवळील एसआरसी या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र उपचारादरम्यान पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, झकारिया इमारतीला स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची नोटीस बजावण्यात आली होती, असे एस वॉर्डचे सहाय्यक आयुक्त महादेव शिंदे यांनी सांगितले.

मुंबईत पाऊस संततधार कोसळत असताना रात्री ३ वाजण्याच्या सुमारास भांडुप पश्चिम क्रॉस रोड, सोनापूर येथे तळ अधिक पाच मजली जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील घरातील प्लास्टर कोसळले. हे प्लास्टर घरात खाली झोपलेल्या तसीन शेख या ५ वर्षीय मुलीच्या अंगावर पडल्याने ती गंभीर जखमी झाली.

तिला एसआरसी या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT