मुंबई

बहिणी लिफ्टबाहेर निघाल्या, मात्र पाच वर्षीय भाऊ निघताना सेफ्टी डोअर झालं बंद; लिफ्टमध्ये चिरडून चिमुरड्याचा मृत्यू

सुमित बागुल

मुंबई : आपली मुलं काय करतात ?  कुठे जातात ? कुणासोबत जातात ? यावर बारीक लक्ष ठेवणे अंत्यंत गरजेचे आहे. सदर घटनेवरून तुम्हाला कल्पना येईल की आपल्या लहानग्यांवर लक्ष ठेवा असं वारंवार का सांगितलं जातं. त्याचंच हे एक धक्कादायक उदाहरण वाचा. धारावीत एका अवघ्या पाच वर्षीय चिमुरड्याचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झालाय. पाच वर्षीय चिमुरड्याचं नाव आहे मोहम्मद  हुजेईफा सर्फराज शेख.

झालं काय?     

पाच वर्षीय मोहम्मद हुजेईफा सर्फराज शेख आपल्या बहिणींसोबत खेळत होता. खेळता खेळता आपल्या भावंडांसोबत ते सर्व जण  चौथ्या मजल्यावर लिफ्टने गेलेत. त्याच्या दोन्ही बहिणी लिफ्टमधून बाहेर पडल्या. मोहम्मद हुजेईफा सर्फराज शेख हा लिफ्टचा दरवाजा लावतच होता. अशात लिफ्टचा सेफ्टी दरवाजा बंद झाला. सेफ्टी दरवाजा बंद झाल्याने लिफ्ट सुरु झाली आणि लिफ्ट वर गेली. त्यामध्येच मोहम्मद  हुजेईफा सर्फराज शेख अडकला आणि चिरडला गेला.  

सदर घटनेनंतर मोहम्मद हुजेईफा सर्फराज शेखच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या घटनेची नोंद घेत पोलिसांनी या इमारतीत राहणाऱ्यांना आपल्या मुलांवर जास्तीत जास्त लक्ष ठेवण्याचं आवाहन केलंय. सोबतच मुलांना कुठेही एकटे सोडू नका असं देखील सांगितलंय. या भीषण दुर्घटनेनंतर पोलिसांनी सर्वच नागरिकांना आवाहन केलंय की आपली मुले लिफ्टने जात असतील तर त्यांना  एकट्याने जाऊ देऊ नका. घरातील कुणी नसल्यास लिफ्ट मॅन तरी सोबत आहे का याची खाती करूनच मुलांना लिफ्टमधून जाऊ द्या.

 त्यामुळे तुम्ही देखील मुलांवर लक्ष ठेवा. अगदी लहानशी चूक देखील जीवावर बेतू शकते. 

five years boy from dharavi stuck between lift and died in accident

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: ‘आरजेडीने’ विकासकामे बंद पाडली; पंतप्रधान मोदी, इंडिया आघाडी अनैसर्गिक

Latest Marathi News Live Update : भुजबळ साहेब लवकर बरे व्हा, खासदार सुप्रिया सुळे यांची पोस्ट

Kartik Purnima 2025: कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार करा 'या' वस्तूचे दान आणि ग्रहदोषातून मुक्ती मिळवा!

भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी बॉलिवूड अभिनेत्रीने तिची संपूर्ण ब्रँड एंडोर्समेंट रक्कम दान केली होती, तुम्हाला माहित्येय का कोण आहे ती?

Shivendraraje Bhosale: आगामी निवडणूकीत कसे लढायचे, याचा निर्णय योग्‍यवेळी: मंत्री शिवेंद्रराजे भाेसले; साताऱ्यातील मेळाव्यात नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT