व्याजाच्या पैशांसाठी गोळीबार; बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर दोघांना अटक

अनिश पाटील
Monday, 30 November 2020

लॉकडाऊनमध्ये व्याजाने दिलेली रक्कम देणे जमले नाही, म्हणून आपल्याला वांद्रे पश्चिम येथील कार्यालयात बोलावून गोळीबार केल्याचा दावा बांधकाम व्यावसायिकाने केला आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

मुंबई : लॉकडाऊनमध्ये व्याजाने दिलेली रक्कम देणे जमले नाही, म्हणून आपल्याला वांद्रे पश्चिम येथील कार्यालयात बोलावून गोळीबार केल्याचा दावा बांधकाम व्यावसायिकाने केला आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

233 कोटींच्या बनावट कंपन्यांच्या पावत्यांद्वारे जीएसटी गैरव्यवहार; दोघांना अटक

या प्रकरणातील तक्रारीनुसार, तक्रारदार नासीर लतीफ शेख (43) हे बांधकाम व्यावसायिक आहेत. फरहान अजगर सय्यद (30) व फेयाज रफीक कुरेश (33) यांची नोटबंदीच्या काळात ओळख झाली होती. ते शेख यांना गेल्या तीन वर्षांपासून व्यवसायासाठी 10 टक्के व्याजाने रक्कम देत होते. या वेळीही त्यांनी कुरेशीकडून 43 लाख रुपये 10 टक्के व्याजाने घेतले. सर्व सुरळीत सुरू होते; पण कोरोनामुळे शेख यांची कामे पूर्ण थांबल्यामुळे शेख यांना घेतलेले 43 लाख रुपये व व्याज देणे शक्य झाले नाही. अखेर कुरेशी व सय्यद यांनी शेख यांना वांद्रे पश्चिम येथील गॉडफ्रे इमारतीच्या तिस-या मजल्यावरील कार्यालयात बोलण्यासाठी बोलावले. त्यावेळी शेख गेले असता आरोपी कुरेशी व सय्यद यांनी त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी थेट पिस्तूल काढून शेख यांना धमकवण्यासाठी गोळीबारही केला. या प्रकरणामुळे घाबरलेल्या शेख यांनी शेख वांद्रे पोलिसांकडे धव घेतली. त्यानुसार वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.

गुटख्याची वाहतूक करणारी आंतरराज्य टोळी अटकेत, 6 लाखांचा  गुटखा जप्त

आरोपी सय्यद व कुरेशी एअर कंडिशनचा व्यवसाय करतात. तसेच त्यांचे एसी दुरुस्तीचे दुकानही आहे. चौकशीत व्याजाच्या रकमेच्या लोभापाई ही रक्कम दिली असल्याचे सांगितले. 43 लाखांची रक्कम आरोपींनी कुढून आणली याबाबतही तपास करण्यात येणार असल्याचे एका अधिका-याने सांगितले.

ST च्या कर्तव्यावरच वडिलानंतर मुलाचाही मृत्यू, सानप कुटूंबियांवर दुखा:चा डोंगर

गोळीबार झालेले कार्यालय सील
गोळीबार केल्याचा दावा बांधकाम व्यावसायिकाकडून करण्यात आला आहेत. एक पुंगळीही सापडली असून, घटनास्थळावरील एका गादीलाही छिद्र पडलेले दिसून आले आहे. तक्रारीनंतर कथित गोळीबार झालेले कार्यालय सील केले असून, बॅलेस्टिक तज्ज्ञांना याबाबतची माहिती देणार आहेत. ते संबंधित पुंगळी व गादीची तपासणी करून गोळीबार झाला की नाही, त्याबाबत अहवाल सादर करतील. आरोपींनी गुन्ह्यांत वापरलेले हत्यार अद्याप हस्तगत केले नसून त्याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत.

-----------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Firing for interest money; Both arrested after complaint from builder