रोहा : शहरात मोठ्या प्रमाणात धुरके पसरले आहे.  
मुंबई

रोह्यातील रहिवाशांचा श्वास गुदमरला

रवींद्र कान्हेकर : सकाळ वृत्तसेवा

कोलाड : रोहा शहर व परिसरात उशिराने का होईना दोन-चार दिवसांपासून थंडीची चाहूल लागली आहे. पहाटे गर्द धुके सर्वत्र पडताना दिसत आहे. याचा आनंद घेण्यासाठी रोहेकर पहाटे घराबाहेर पडतात खरे; मात्र या धुक्‍यात आल्यावर विषारीपणाची जाणीव होत असल्याने नागरिकांचा जीव त्यात गुदमरून जात आहे. 

यावर्षीचा लांबलेल्या पावसाळ्यामुळे थंडीचे आगमनही उशिराने झाले आहे. रोहा शहर व परिसरात दोन दिवसांपासून हवेत मस्त गारवा येत गाढ धुकेही पडू लागले आहे. यामुळे पहाटे हे आल्हाददायक वातावरण अनुभवण्यासाठी रोहेकर सकाळी घराबाहेर मोठ्या संख्येने पडू लागले आहेत; मात्र उत्तम आरोग्यासाठी हे फिरणे सकाळच्या विषारी धुक्‍यामुळे आरोग्यास हानिकारक ठरत आहे. मंगळवारी तर या धुक्‍यामध्ये औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमधून सोडण्यात येणाऱ्या वायूंचे प्रमाण जास्त होते. यामुळे नागरिकांचे डोळे चुरचुरत होते व नाकाने श्वास घेते वेळी जळजळल्यासारखे होत होते. 

रोहा शहर व धाटाव औद्योगिक वसाहत यामधील अंतरातच बहुतेक सर्व शाळा आहेत. या शाळांमध्ये जाणारे लहानगे विद्यार्थीही या विषारी धुक्‍याचा त्रास सहन करत आहेत. आजच्या वाढत्या प्रादुर्भावाने काही शाळांतील विद्यार्थ्यांना मळमळ झाल्यासारखे वाटत होते. त्यामुळे शाळांमधील विद्यार्थ्यांसह रोहेकर नागरिक त्रस्त होत आहेत. सकाळच्या वेळी या धुक्‍यापासून बचाव करण्यासाठी नाकाला रुमाल बांधूनच विद्यार्थ्यांना शाळांमध्ये जावे लागते. पावसाळा व हिवाळ्यात औद्योगिक वसाहतीमधील कारखाने निसर्गातील बदलाचा फायदा घेत आपल्या कारखान्यातील घातक रसायने व वायू बाहेर सोडतात, त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. उद्योग टिकले तरच रोजगार मिळेल, या तत्त्वावर सर्वसामान्य नागरिक औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचे प्रदूषण सहन करत आहेत. मात्र, असे असताना हेच कारखाने नेहमी निसर्गाच्या ऋतूमानातील बदलांचा गैरफायदा घेत प्रदूषण करत आहेत. हेच या विषारी धुक्‍यामुळे समोर येत आहे. प्रदूषण करणाऱ्या या कारखान्यांवर कारवाई कधी होणार? असा सवाल रोहा शिवसेनेने केला आहे. 

धाटाव औद्योगिक वसाहतीमधील कामगारांनी सांगितल्याप्रमाणे धुक्‍यामध्ये एक्‍सल व ट्रान्सवर्ल्ड या कारखान्यांमधून विषारी वायू सोडण्यात येतो, असे शिवसेना तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी सांगितले आहे. नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर शेडगे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांच्यासह प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे या संबंधित तक्रार करत यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. दोषी आढळणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा; अन्यथा नागरिकांच्या आरोग्यासाठी संबंधित कारखान्यांसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समीर शेडगे यांनी प्रशासनाला दिला आहे. धाटाव औद्योगिक परिसरात आजपर्यंत असलेले प्रदूषण आता रोहा शहरापर्यंत आल्यामुळे आता यावर कोणती कारवाई प्रशासनाकडून होते, याकडे रोहेकरांचे लक्ष लागले आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी या सर्व परिस्थितीची दखल घ्यावी. प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी; अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल.
- समीर शेडगे, शिवसेना तालुकाप्रमुख

नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत विभागीय निरीक्षकांना तातडीने या संबंधी चौकशी करून आपला अहवाल देण्यास सांगितले आहे. त्यांच्याकडील चौकशी अहवाल आल्यानंतर जे कारखाने दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई करण्यात कोणतीही कसूर करण्यात येणार नाही, असे सांगितले आहे.
- जगन्नाथ साळुंखे, प्रादेशिक अधिकारी, एमपीसीबी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: मॅचच्या काही तास आधी मोठं संकट! इकाना स्टेडियमजवळ गोमतीचं पाणी, अंडरपास जलमय; भारत-वेस्ट इंडिजच्या सामन्यावर प्रश्नचिन्ह?

Satara District Bank: दहा वर्षांच्या संचालकपदाचा मुद्दा तापला; सातारा जिल्हा बँक निवडणुकीत सात हरकती, वकिलांचा जोरदार युक्तिवाद

UPPCS interview: कोट नीट केला, केस विंचरले, मिठाई भरवली; UPPCS मुलाखतीआधी वडिलांचा हा निरोप पाहून डोळे पाणावले, व्हिडिओ व्हायरल

Marathi News Live Updates: विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न, त्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही; लोकसेवा आयोगाच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Nagpur Crime: मैत्रिणीच्या माध्यमातून ओळख, प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचा आरोप; १७ वर्षीय मुलीवरील अत्याचारप्रकरणी तरुणावर पॉक्सो

SCROLL FOR NEXT