Amruta Fadnavis
Amruta Fadnavis Sakal Digital
मुंबई

मुंबईच्या वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट; अमृता फडणवीसांचा तर्क

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस Amruta Fadnavis या सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. आताही त्या त्यांच्या अजब वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांनी मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे मुंबईमध्ये घटस्फोट वाढल्याचा अजब तर्क अमृता फडणवीस यांनी काढला आहे. त्यामुळे त्यांच्यावर आता सोशल मीडियावरुन टीकेला सुरुवातही झाली आहे. त्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या शैलीत मिसेस फडणवीस यांचे कान टोचले आहे. काय म्हणाल्या मिसेस फडणवीस हे आपण पाहणार आहोत.

मी एक सामान्य नागरिक म्हणून बोलत आहे. मी जेव्हा घराच्या बाहेर पडते तेव्हा सगळीकडे खड्डे दिसतात. आपल्या फॅमिलीला वेळ देता येत नाही. अशावेळी कुणी काहीही बोलायला तयार नाही. सामान्य नागरिक म्हणून मला यागोष्टीचे नवल वाटते. म्हणून मुंबईमध्ये तीन टक्के घटस्फोट झाले आहेत. अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे. त्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. त्यांनी आपण ऐकावं ते नवलं असं म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अमृता फडणवीस यांनी अशाप्रकारचे वक्तव्य करुन लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे.

यापूर्वी अमृता फडणवीस यांनी कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर गंभीर टीका केल्याचे दिसून आले होते. त्यामध्ये वादग्रस्त प्रतिक्रिया देऊन अमृता यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी अमृता यांना घेराव घातला. आणि त्यांना वेगवेगळ्या प्रश्नांवर बोलते केले. त्यावेळी अमृता यांनी दिलेली प्रतिक्रिया आता चर्चेत आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी बिभव कुमारला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: किर्गिस्तानमध्ये हिंसाचार चार पाकिस्तानी विद्यार्थी ठार; भारतीय विद्यार्थीही ठरले लक्ष्य

Online Vegetable Shopping : Blinkit भाजी खरेदीवर फ्री कोथिंबीर घेण्यास नकार! नेटकऱ्यांनी केली 'ही' मागणी

शरद पवारांना धक्का! 'या' नेत्याची 'राष्ट्रवादी'ला सोडचिठ्ठी; शिंदे म्हणाले, हातातोंडाशी आलेल्या मुलानं कायमस्वरूपी..

SCROLL FOR NEXT