माथेरान
माथेरान  File photo
मुंबई

माथेरानमध्ये ४०० घोड्यांवर उपासमारीचे संकट

दीनानाथ परब

नेरळ: महाराष्ट्रात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट थोपवण्यासाठी लॉकडाउन सदृश्य निर्बंध लावण्यात आले आहेत. ज्याचा पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसतोय. कोरोनाच्या पहिल्या लाटेतून पर्यटन व्यवसाय आत्ता कुठे सावरत असतानाच, आता दुसऱ्या लाटेचा फटका बसलाय. मुंबईच्या जवळ असलेलं पर्यटन स्थळ म्हणजे माथेरान. माथेरानला नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. पण कोरोनाची दुसरी लाट आणि निर्बंध यामुळे माथेरान सध्या ओस पडले आहे.

पर्यटकांनी माथेरानकडे पाठ फिरवलीय. ज्याचा फटका माथेरानमधल्या सर्वसामान्य नागरिकांबरोबर घोड्यांनाही बसणार आहे. माथेरान फिरायला येणार पर्यटक घोडस्वारीचा आनंद घेतात. घोड्यांवर बसून वेगवेगळया पोझमधले आकर्षक फोटो काढतात. पण सध्या पर्यटकच नसल्याने हे घोडे निवातं उभे असून त्यांच्यावर लवकरच उपासमारीची वेळ येऊ शकते असे घोडे मालकांनी म्हटले आहे.

या अनिश्चित परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी राज्य सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. माथेरानमध्ये २३५ मालकांकडे ४६० परवानाधारक घोडे आहेत असे राकेश कोकाळे यांनी सांगितले. या घोड्यांवर पर्यटकांना बसवून माथेरान फिरवले जाते. पण सध्या पर्यटक नसल्याने उत्पन्नच नाहीय, त्यामुळे घोड्यांच्या खाण्या-पिण्याचा खर्च उचलणे कठिण बनणार आहे.

"दुसऱ्या लॉकडाउनचा आमच्या उत्पन्नावर परिणामा झालाय. आमच्या घोड्यांचा अन्नाचा खर्च भागवणे सुद्धा आम्हाला परवडू शकत नाही" असे कोकाळे यांनी सांगितले. "गहू, चारा, ओट आणि चणे हे घोड्याचे खाणे आहे. त्यांना पोषक आहार लागतो. एका घोड्याचा दिवसाचा खर्च २५० रुपये आहे" असे कोकाळे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT