mumbai building collapse 
मुंबई

Mumbai | मुंबईत चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू, ९ जण रुग्णालयात

अग्निशामक दल आणि पोलिसांकडून बचाव कार्य सुरु आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईच्या (Mumbai) कुर्ला भागातील एक चार मजली इमारत आज मंगळवारी (ता.२८) पहाटे कोसळली आहे. अग्निशामक दल आणि एनडीआरएफ पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यांच्याकडून बचावाचे कार्य सुरुच आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने ढिगाऱ्या खाली अडकलेल्या ७ लोकांना वाचवले आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. (Four Storey Building Collapses Kurla Area Of Mumbai)

साधारपण २० ते २५ जण ढिगाऱ्या खाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशामक दल आणि एनडीआरएफकडून बचाव कार्य सुरु आहे. राज्याचे पर्यंटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. ते म्हणाले, पाच ते सात लोकांना वाचवण्यात आले. सर्व चार मजली इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र लोकांचे तेथे राहतच आहेत.

आमचा अग्रक्रम आहे, की सर्वांना वाचवणे, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. किती जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत, याबाबत अद्याप खात्री नसल्याचे एनडीआरएफचे डेप्टी कमांडंट आशिष कुमार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swargate News : एसटीला ‘लाडकी बहिणच’ नकोशी! बससेवेत महिला आणि ज्येष्ठ नागरिकांवर भेदभाव

SIR प्रक्रियेच्या १२ राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचे नाव का नाही? निवडणूक आयोगाने थेट उत्तरच दिले!

Harman Investment Pune : पुण्यात होणार तब्बल ३४५ कोटींची गुंतवणूक; ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्समध्ये मिळणार नोकऱ्या

कलर्स मराठीची नवी कल्पना कामी आली! 'बाईपण जिंदाबाद'चं प्रेक्षक करतायत भरभरून कौतुक; म्हणतात- आश्चर्य वाटलं की...

Latest Marathi News Live Update : पेणच्या नुकसानग्रस्त शेतीची शिवसेना ठाकरे गटाकडून पाहणी

SCROLL FOR NEXT