Crime esakal
मुंबई

Mumbai Crime : अंडरवर्ल्ड कॉन्ट्रॅक्ट किलिंगशी संबंधित 40 वर्षांपासून फरार वाँटेड आरोपी अखेर अटकेत

गेल्या 40 वर्षांपासून फरार असलेल्या डोंगरीच्या एका वाँटेड आरोपीला शुक्रवारी अटक करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - गेल्या 40 वर्षांपासून फरार असलेल्या डोंगरीच्या एका वाँटेड आरोपीला शुक्रवारी अटक करण्यात आले. सय्यद ताहेर सय्यद हासीम असे आरोपीचे नाव असून, सय्यद अंडरवर्ल्ड आणि कॉन्ट्रॅक्ट किलिंगशी संबंधित अनेक गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील होता. आरोपीला शुक्रवारी मुंबईतील न्यायलयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पॅरोलने पलायन

आरोपी सय्यदला 1982 मध्ये मुंबईतील न्यायलयाने हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यानंतर आरोपी सय्यद तुरुंगात शिक्षा भोगत होता. दरम्यान सय्यदला पॅरोल मंजूर करण्यात आला परंतु तुरुंगात परतला नाही, परिणामी न्यायालयाने त्याला 1985 मध्ये फरारी म्हणून घोषित केले. अनेकदा शोध तो पोलिसाना चकवण्यात यशस्वी राहिला. सय्यदने त्याच्या कुटुंबासह डोंगरी येथील त्यांचे निवासस्थान देखील सोडले होते.

न्यायालयाकडून वॉरंट

काही महिन्यांपूर्वी, न्यायालयाने सय्यदविरुद्ध एका प्रकरणात स्थायी वॉरंट जारी करत, डोंगरी पोलिसांनी आरोपीचा व्यापक शोध घेण्यास सांगितले. डोंगरी पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी एक पथक तयार केले. पोलिसांकडून प्रामुख्याने आरोपी सय्यदचे कल्याण मॅन्शन, एसव्हीपी रोड येथील डोंगरी हे शेवटचे ज्ञात ठिकाण होते.

पोलीस पथकाने सय्यदशी संबंधित व्यक्तींशी चौकशी केली. त्यानंतर अनेक महिन्यांच्या तपासानंतर पोलिसाना आरोपीपर्यंत पोहोचविणारा पहिला धागा मिळाला.

पोलीस तपास

सय्यद हा इराणी शिया मुस्लीम असल्याने, त्याच्या आईच्या मृत्यूनंतर तो माझगाव येथील इराणी शिया स्मशानभूमीत येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, ही माहिती पाच वर्षे जुनी असल्याने पोलिसांना अधिक तपशीलांची गरज होती. सुदैवाने, काही आठवड्यांनंतर, पोलिसाना सय्यद हैदराबादला, विशेषत: एरागड्डा नावाच्या ठिकाणी स्थलांतरित झाल्याची माहिती मिळाली.

आरोपीचे स्थान निश्चित करण्यासाठी, पोलिसांनी त्याचा फोन नंबर मिळवला. आरोपीचे स्थान कळल्यानंतर, पोलीस पथकाने आरोपीच्या आसपासच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. तीन दिवस आणि रात्र सतत पाळत ठेवल्यानंतर, स्थानिक बोराबांडा पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या घरावर छापा टाकून त्याला अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, सय्यद अंडरवर्ल्ड आणि कॉन्ट्रॅक्ट किलिंगशी संबंधित अनेक गुन्हेगारी कारवायांमध्ये सामील होता. आरोपीला मुंबईतील न्यायलयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT