Ganesh Chaturthi 2022 Grand arrival of Chintamani of Chintapokli mumbai sakal
मुंबई

Ganesh Chaturthi 2022 : चिंचपोकळीच्या चिंतामणीचे भव्य आगमन

गणेशभक्तांचा सागर लोटला; ढोल-ताशांच्या नादात ‘बाप्पा मोरया’चा गजर

सकाळ वृत्तसेवा

शिवडी : गिरणगावातील १०३ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या गणेशाचे शनिवारी (ता. २७) सुप्रसिद्ध मूर्तिकार रेश्मा खातू यांच्या चिंचपोकळी येथील कार्यशाळेतून ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या उत्साहात आणि गणपती बाप्पा मोरयाचा जागर करीत आगमन झाले. या आगमन सोहळ्यास भक्तांचा सागर लोटला होता.

भक्तांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. चिंचपोकळीचा पूल धोकादायक असल्याने पुलावर गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने मंडळाने कार्यकर्त्यांची फौज उभारली होती. गर्दीत एका मुलाला त्रास होऊ लागल्‍यावर अम्ब्युलन्समधून रुग्‍णालयात नेण्यात आले. लाईव्ह दर्शनाची सोयदेखील केली होती. या आगमनावेळी एक अम्ब्युलन्स आली असता कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी तिला गर्दीतून वाट काढून दिली.

गणेशभक्तांना दिवसभर गर्दीचा त्रास

मुंबई :अवघ्या तीन दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. बाप्पाच्या आगमनाची अंतिम तयारी करण्यासाठी शनिवारी मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडले होते. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर गर्दी उसळली होती. त्यातच त्यात सकाळी सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना दिवसभर लोकलचा गर्दीतून प्रवास करावा लागला आहे. खरेदीसाठी अखेरचा शनिवार दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक घराबाहेर पडले होते. त्यामुळे दादर, लालबाग, क्रॉफर्ड मार्केट, विलेपार्ले बाजारपेठांमध्ये गणेशभक्तांची मोठी गर्दी उसळली होती.

मेगाब्लॉक रद्द

प्रवाशांची गैरसोय होऊ नयेत म्हणून मध्य आणि पश्चिम रेल्वेने रविवारचा नियमित घेण्यात येणारा मेगाब्लॉक रद्द केला आहे. रविवारी मेगाब्लॉक असल्याच्या भीतीने अनेक प्रवासी शनिवारी घराबाहेर पडले होते. परिणामी, प्रवाशांना लोकलच्या गर्दीचा सामना करावा लागला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT