

Controversy in Bibidarphal: Shivaji Maharaj Equestrian Statue Erected at Midnight
esakal
-दयानंद कुंभार
सोलापूर(वडाळा): बीबीदारफळ (ता. उत्तर सोलापूर ) येथे बुधवार दिनांक 18 रोजी मध्यरात्री मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा अज्ञात व्यक्तींनी विराजमान केला. सकाळी पुतळा पाहताच अनेक त्यांना आश्चर्य वाटले. त्यामुळे स्थानिक पोलीस पाटील शहाजी पाटील यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याला खबर दिली.