मुंबई

ठाण्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर?

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई- लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून ठाणे लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून गणेश नाईक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

गणेश नाईक यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गणेश नाईक, जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे आणि इतर नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत ठाण्यातील राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित झाला असून गणेश नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अजून अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली नाही.

ठाणे शहर हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. अपवाद वगळता येथे सर्वच राजकीय संस्थांवर शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. दरम्यान, यावेळच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे हे ठाणे काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून, या मतदारसंघातून नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरु आहे.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीनंतर आपले राजकीय वजन वाढवण्यासाठी अधिकाधिक खासदार निवडून आणण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघातून दिग्गज उमेदवारांना रिंगणात उतरवण्याची रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसने आखली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Hardik Pandya MI vs KKR : पांड्यानं केली मोठी चूक; त्याच्यामुळेच मुंबईची ही अवस्था... इरफाननं कॅप्टन हार्दिकवर साधला निशाणा

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT