crime esakal
मुंबई

Mumbai Crime : दांडिया कार्यक्रमाच्या बनावट पासांची विक्री करणारी टोळी पोलिसांकडून अटकेत

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मुंबईत भाजप आमदार यांनी आयोजित गरब्याच्या बनावट प्रवेशिकांची विक्री करून फसवणूक करणाऱ्या चौघांना 12 तासात पोलीसानी अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मुंबईत भाजप आमदार यांनी आयोजित गरब्याच्या बनावट प्रवेशिकांची विक्री करून फसवणूक करणाऱ्या चौघांना 12 तासात पोलीसानी अटक केली आहे. या प्रकरणी आरोपीचे 2 दोन पसार साथीदारांचा असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

करण शाह, दर्शन गोहिल, परेश नेवरेकर तसेच कवीश पाटील अशी अटक आरोपीची नाव असून मुख्य आरोपी करण हा वेब डिझायनर आहे. वेब सिरीज पाहून गुन्हा करण्याची युक्ती सुचल्याचे आरोपीने चौकशीत सांगितले आहे.

बनावट प्रवेशिका

नवरात्र उत्सव समिती बोरिवली आणि स्थानिक आमदार सुनील राणे यांच्यातर्फे बोरिवलीतील दांडिया नाईट्स कार्यक्रमाचे आयोजन 15 ऑक्टोबर पासून करण्यात आले. त्याच्या प्रवेशिकांची विक्री बोरिवलीतील कच्छी मैदान या ठिकाणावर तसेच ऑनलाईन संकेतस्थळाद्वारे करण्यात येत आहे.

कार्यक्रमास आलेल्या काही तरुणांनी त्यांना मिळालेल्या प्रवेशिका बनावट असल्याची तक्रार आयोजक नीरव मेहता यांच्याकडे केली. आयोजक निरव मेहतांचा मित्र करण शहा याने दर्शन गोहिल नावाच्या व्यक्तीकडून घेऊन प्रत्येकी 3000 रुपये याप्रमाणे 10 प्रवेशिका विकल्याचे उघड झाले.

पोलीस तपास

त्यानुसार बोरिवलीतील एमएचबी कॉलनी पोलिसांत आयोजकांनी तक्रार दाखल केली. गुन्हा नोंद करत पोलिसांनी तपास सुरू केला. पोलीस पथकाने त्याप्रमाणे आरोपीचे लोकेशन ट्रेस करून चौघा आरोपींना अटक केली. विरार, कांदिवली, मालाड मधून मोबाईल लोकेशनच्या मदतीने त्यांनपोलिसांनी शोधून काढले.

आरोपीकडून पोलिसांनी 30 लाख रुपयांच्या बनावट प्रवेशिका, होलोग्राम स्टिकर, लॅपटॉप, प्रिंटर व इतर साधन सामुग्री मिळून 35 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी करण शहा हा ग्राफिक डिझायनर चौकशीत उघड झाले आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT