Shrikant Shinde sakal media
मुंबई

गणेश भक्तांसाठी 101 रुपयात बाप्पाची मूर्ती; शिवसेनेच्या 'या' खासदाराचा उपक्रम

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : गणेशोत्सवावर (ganpati festival) कोरोनाचे सावट (corona) यंदाही आहे. लॉकडाउनमुळे (lockdown) आर्थिक संकटात (finance issue) सापडलेल्या गणेश भक्तांना (ganesha prayers) घरगुती गणेशोत्सव आनंदात साजरा करता यावा म्हणून शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (dr shrikant shinde) यांनी यंदा गणेश भक्तांना अवघ्या 101 गणेश मूर्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. डोंबिवली (dombivali) शिवसेना शहर शाखेच्या वतीने हा उपक्रम डोंबिवलीत राबविला जाणार आहे.

कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे अनेक नागरिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या आर्थिक संकटातून सावरत नाही तोच अतिवृष्टीतील पुरामुळे खाडी किनाऱ्यालगत राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पाणी घुसून त्यांचे नुकसान झाले आहे. गणेशोत्सव जवळ आला असून हिंदू प्रथे परंपरेनुसार घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या भक्तांना घरी गणेशाची स्थापना करावीच लागणार आहे.

कोरोना महामारीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या डोंबिवलीकर कुटुंबीयांना गणेशोत्सवाचा आनंद प्राप्त व्हावा या दृष्टिकोनातून एक सामाजिक बांधिलकी जपत डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना डोंबिवली शहर शाखेच्या वतीने यंदा शाडूच्या व कागदाच्या लगद्याच्या गणपतीच्या 500 मूर्ती, सेवा म्हणुन अगदी नाममात्र अशा 101 रु. किमतीत देण्याचे ठरवले आहे. कोरोनाचे संकट पाहता यावर्षी गणेश भक्तांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रथम येणाऱ्या 500 भाविकांना नाममात्र 101 रुपयात गणेश मूर्ती दिल्या जाणार आहेत. शिवसेना डोंबिवली मध्यवर्ती शाखेत भाविकांनी संपर्क साधून आपल्या गणेशाची मूर्ती बुक करावी असे आवाहन डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla 18 Days in Space: शुभांशु शुक्लांनी अंतराळात १८ दिवस कसे घालवले, नेमकं काय-काय केलं अन् सोबत काय आणलं?

ICC World Cup 2025: आठ संघांच्या सराव सामन्याचे वेळापत्रक घोषित; यजमान टीम इंडिया 'या' दोन संघाविरुद्ध खेळणार

Epfo Rule: आता भाडे नाही, तर ईएमआय भरा! घर खरेदी करण्यासाठी पीएफ आर्थिक आधार देणार, ९० टक्के रक्कम मिळणार

क्रिती सेनॉन-जावेद जाफरीच्या इमारतीत घुसला अज्ञात व्यक्ती, बॅगेतली ती वस्तू लिफ्टमध्ये ठेवली आणि... 'त्या' कृत्यानं सोसायटीत खळबळ

Mumbai News: विद्यार्थ्यांची बससेवा बंद! मनपाच्या थकबाकीमुळे शिक्षणावर गदा, शिवसेनेचा इशारा

SCROLL FOR NEXT