sanitizer ganpati 
मुंबई

गजबच! बाप्पाच्या दर्शनाला 'सॅनिटायझर'चा प्रसाद, असं तुम्ही नक्कीच कधीही पाहिलं नसेल

निलेश मोरे

घाटकोपर :  गणेशोत्सव चार दिवसांवर आलेला आहे. यंदा जागतिक कोरोनाच्या महामारीमुळे सण उत्सवावर देखील त्याचा मोठा फटका बसलेला आहे. दरवर्षी उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होणाऱ्या गणेश उत्सवाची गणेश भक्तांना कोरोना बाबतची मोठी चिंता आहे. यंदा मोठे उत्सव रद्द झाले असले तरी साध्या पद्धतीने साजरा होणाऱ्या उत्सवाला गणपतीच्या दर्शनाला जाताना सामाजिक अंतर ठेवणे, मास्क लावणे आणि मुख्य म्हणजे सॅनिटायजरचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र घाटकोपर मधील नितीन चौधरी आणि संगीता चौधरी या दाम्पत्यांनी चक्क गणपतीच्या समोर दर्शनाला गेल्यास तुमच्यावर आपोआप सॅनिटायझर उडेल अशी व्यवस्था केली आहे.

घाटकोपर येथील साईनाथ नगर  विभागात असलेल्या प्रांजळ गणेश कला केंद्रात गणेश भक्तांसाठी अनोखी गणेश मूर्ती उपलब्ध करून देण्यात आली आहे. गणपती बापाच्या हातात शस्त्र ऐवजी सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. सेन्सर आणि स्प्रे चा उपयोग करून गणपतीच्या मूर्तीच्या हातात असलेल्या शस्त्रातून चक्क सॅनिटायझर स्प्रे करण्याची प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्याच बरोबर या मूर्तीच्या मुकुट आणि दागिन्यात एलईडी लाईट्स बसविल्या असून या रंगीत लाईट रिमोटद्वारे त्यांचा वेग आणि चमकण्याचे प्रकार आणि रंग रिमोट कंट्रोल द्वारे बदलता येणे शक्य आहे. नाट्यक्षेत्रात लाईटस सप्लायर म्हणून काम करणारे नितीन चौधरी गेले अकरा वर्ष गणेशमूर्ती विक्रीचा व्यवसाय करीत आहेत. गणपतीची मूर्ती अधिकाधिक आकर्षक करण्यासाठी ते पूर्वी मोती, मनी, डायमंड इत्यादींचा वापर करीत होते. परंतु पाच वर्षांपूर्वी त्यांना गणपतीच्या मूर्ती मध्ये एलईडी लाईट लावून हि मूर्ती आणखी रेखीव केल्या त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.

यंदा कोरोनाचे संकट आणि त्यावर गणपती बाप्पा विघ्नहर्ता असल्याने त्याने भक्तांवरील संकटावर मात करावी  यासाठी ही संकल्पना आम्हाला सुचली असल्याचे मूर्तिकार नितीन चौधरी व संगीता चौधरी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. गणपतीच्या शस्त्रातून कोरोनाचा नाश होत आहे ही संकल्पना प्रत्यक्ष सॅनिटायजरचा स्प्रेच करून राबविता येईल का यासाठी त्यांनी प्रयोग सुरू केले. त्यातून सेन्सरचा वापर करून स्प्रे करता येईल असे त्यांना सुचले आणि त्यांनी गणपती चे त्रिशूल तसेच इतर शस्त्रात स्प्रे बसविले आणि त्याला सेन्सरने जोडले.ज्या वेळेस गणेशभक्त मूर्ती समोर जातात तेव्हा आपोआप गणेशभक्तांवर सॅनिटायजर चा स्प्रे होतो आहे. सदर मूर्ती ही श्रीमंत नवशा गणपती मंडळ अक्कलकोट ने बुक केली असून सोमवारी (ता. 17)  रात्री 10 वा घाटकोपर येथून अक्कलकोटला रवाना होणार आहे.

(संपादन : वैभव गाटे)

ganpati idol maker make spray sanitizer idol in mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Updates : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही मुंबई-पुणे, मराठवाड्याला धोक्याचा इशारा

Kolhapur Dussehra : कोल्हापूरसाठी 'हा' कसला मानाचा तुरा, म्हणे राज्याचा प्रमुख महोत्सव; शाही दसऱ्यासाठी निधीच नाही

World Wrestling Championship 2025 : भारताच्या सुजीतची कडवी झुंज अपयशी, ऑलिंपिक विजेत्या रहमानचा ६-५ने विजय

सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं निधन, वयाच्या ४८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jalgaon News : पाचोरात ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार, २५० गुरे वाहून गेली, असंख्य गावे पाण्याखाली

SCROLL FOR NEXT