Gateway of India Latest Marathi News Gateway of India Latest Marathi News
मुंबई

‘गेटवे ऑफ इंडिया’ परिसरात कार्यक्रमासाठी लागणार शुल्क; नियमावली निश्चित

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई शहराचे मानचिन्ह असलेल्या ‘गेटवे ऑफ इंडिया’ (Gateway of India) या राज्य संरक्षित स्मारकाच्या परिसरात शासकीय विभाग, खाजगी आणि गैरशासकीय संस्था यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमासाठी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नियमावली व शुल्क निर्धारण निश्चित करण्यात आले आहे. ‘गेट वे ऑफ इंडिया’ हे पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे ‘अ’ गटात असलेले राज्य संरक्षित स्मारक आहे, हे विशेष... (Gateway of India Latest Marathi News)

‘गेटवे ऑफ इंडिया’ (Gateway of India) येथे भारतीय सेना दल, हवाई दल व नौदलाने कार्यक्रम सादर केल्यास व प्रकाशयोजनेचे कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. पोलिस व निमलष्करी दल यांच्यामार्फतही कार्यक्रम असल्यास शुल्क आकारण्यात येणार नाही. मात्र, शासकीय विभागाचा कार्यक्रम असल्यास प्रत्येक दिवशी ५० हजार रुपये आणि प्रकाशयोजनेसाठी प्रति दिवस १० हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

असे आकारले जाणार दर

  • अव्यावसायिक/स्वयंसेवी संस्था, धर्मादाय संस्थेसाठी प्रत्येक दिवशी एक लाख रुपये आणि प्रकाशयोजनेसाठी प्रति दिवस ५० हजार रुपये शुल्क

  • व्यावसायिक कार्यक्रम, व्यवस्थापन संस्थेने कार्यक्रम आयोजित केल्यास प्रत्येक दिवशी ५ लाख रुपये आणि प्रकाशयोजनेसाठी प्रति दिवस एक लाख रुपये शुल्क

  • विदेशी दूतावासामार्फत आयोजित कार्यक्रमासाठी एक लाख रुपये आणि प्रकाशयोजनेसाठी प्रति दिवस दहा हजार रुपये शुल्क

  • कार्यक्रमाच्या नियोजित तारखेच्या कमीत कमी २१ दिवस आधी अर्ज संचालनालयास प्राप्त होणे आवश्यक आहे.

  • अर्ज उशिरा प्राप्त होऊन नियोजित तारीख उपलब्ध असल्यास एक लाख रुपये इतके जलद शुल्क आवेदकांना भरावे लागतील.

  • शासकीय आस्थापनांचे व दूतावासांचे अर्ज १५ दिवस आधी संचालनालयास प्राप्त होणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Super 8s Schedule : भारतीय संघाचे 'सुपर ८' मधील वेळापत्रक ठरले; बघा कोणत्या तीन संघांचा सामना करणार अन् कधी...

Buldhana Crime: हुंड्याच्या छळामुळे विवाहितेने संपवले जीवन; पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

तुम्हालाही राग येतो? हृदय विकाराचा वाढतो धोका, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा

Latest Marathi News Update : राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची निर्दोष मुक्तता

Sangli Fire : नशेखोरांकडून मोकळ्या इमारतीत आग; भरदिवसा धिंगाणा, महापालिकेच्‍या अग्निशमन दलाने आटोक्यात आणली आग

SCROLL FOR NEXT