मुंबई

वर्षभरापासून कोरोना रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्ससाठी चांगली बातमी

सकाळ वृत्तसेवा, भाग्यश्री भुवड

मुंबई: कोरोनाची दुसरी लाट मुंबईसह महाराष्ट्रात वेगाने पसरत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने लोक विषाणूच्या विळख्यात येत आहेत. वाढत्या रूग्णांमुळे पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवरचा बोजा वाढत आहे. अशा परिस्थितीत वर्षभरापासून वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये कार्यरत रहिवासी डॉक्टरांसह सर्व आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्याची तयारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने केली आहे. वेबिनारद्वारे, ज्येष्ठ डॉक्टर त्यांचे स्वत:चे विचार आणि अनुभवाद्वारे कोरोना रूग्णांवर उपचार करणार्‍या आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणार आहेत.

कोरोना विषाणूचा पुन्हा एकदा मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा जोर वाढला आहे. मुंबईत दररोज सुमारे 9 हजार रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे मुंबईतील सरकारी व खासगी रुग्णालयांवर ताण वाढताना दिसत आहे. गेल्या वर्षभरापासून वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमधील डॉक्टर कोरोना रुग्णांच्या उपचारांमध्ये गुंतले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांच्यावर भार वाढताना दिसत आहे. या ओझ्याने त्यांचे मनोबल कमी होऊ नये म्हणून आरोग्य विज्ञान विद्यापीठाने एक नवीन पुढाकार घेतला आहे.

या उपक्रमाचे मुख्य समन्वयक व नियंत्रक डॉ. रवींद्र देवकर यांनी सांगितले की आता विद्यापीठामार्फत दर महिन्याला दोन वेबिनार आयोजित केले जातील. या वेबिनारच्या माध्यमातून विद्यापीठाचे कुलगुरूंसह ज्येष्ठ डॉक्टर त्यांच्या विचारांचा आणि अनुभवाद्वारे निवासी डॉक्टर, महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कार्यरत विद्यार्थ्यांसह आरोग्यसेवकांचे मनोबल वाढवतील. इतकेच नाही तर या वेबिनारच्या माध्यमातून कोविडसंबंधित उपचारांची अधिक माहितीही दिली जाईल. कोरोना इन्फेक्शनचा उपचार कसा करावा? हेदेखील या वेबिनारमध्ये अधिक विस्तृत स्वरूपात सांगितलं जाईल. तसेच रुग्णांच्या उपचाराशी संबंधित डॉक्टरांच्या प्रश्नांची वरिष्ठ व अनुभवी डॉक्टर्श उत्तरेदेखील देणार असल्याचे देवकर यांनी स्पष्ट केलं.

(संपादन - विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Mandir Donation Scam: "होय, माझी चूक झाली..." चंपत राय यांचा राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात मोठा खुलासा

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ट्वेंटी-२० वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये पोर्तुगालकडून खेळणार; ICC नियमांची पुर्तता, आता मैदान गाजवण्यास सज्ज

Latest Marathi News Live Update : गोकुळ निवडणुकीपूर्वी सतेज पाटील यांचा शक्तिप्रदर्शन मेळावा, रणनीतीकडे सर्वांचे लक्ष

FDA Action: तुकाराम मुंढेंचा दणका! मुंबईतील उपाहारगृहे, हॉटेलचे परवाने रद्द, १९ जण अटकेत; एफडीएची मोठी कारवाई

Nasrapur Crime Case : भीमराव कांबळे आणखी कठोर शिक्षेस पात्र : न्यायालय

SCROLL FOR NEXT