मुंबई

गोरेगावात सात हजार घरे उभारणार 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - म्हाडाचा 2019-20 चा 1 हजार 566 कोटींचा शिलकीचा अर्थसंकल्प मंगळवारी (ता. 5) म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत सादर करण्यात आला. यंदाचा अर्थसंकल्प 8 हजार 259 कोटींचा असून, त्याला म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी मंजुरी दिली आहे. यामध्ये जमीन खरेदी आणि गृहनिर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे. या अर्थसंकल्पात गोरेगाव येथील पहाडी गोरेगाव येथे सात हजार घरांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट अर्थसंकल्पात ठेवण्यात आले आहे. यापैकी 1 हजार 947 घरे पंतप्रधान आवास योजनेतून उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, पुढील दोन वर्षांत मुंबईकरांना ही घरे उपलब्ध होणार आहेत. 

सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जमीन खरेदी करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच म्हाडाच्या सर्वच मंडळांच्या वसाहतींमधील पायाभूत सुविधांकरिता 275 कोटींची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या माध्यमातून इमारतींच्या दुरुस्तीसाठी 5 कोटी 28 लाखांची तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे संक्रमण शिबिरांचा पुनर्विकास करण्यासाठी पाच कोटी प्रस्तावित केले आहेत, तर मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळासह म्हाडाच्या कोकण, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती आणि औरंगाबाद मंडळांसाठीही या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली  आहे. 

अर्जदारांना दिलासा 
मुंबई मंडळाच्या सोडतीमध्ये अर्ज करू इच्छिणाऱ्या नागरिकांना प्राधिकरणाने दिलासा दिला आहे. अर्जासोबत भरण्याची अनामत रक्कम कमी करण्यात आली असून, अत्यल्प उत्पन्न गटात अर्ज करणाऱ्यांना आता 15 हजारांऐवजी 10 हजार रुपये भरावे लागणार आहेत, तर अल्प उत्पन्न गटात 25 हजारांऐवजी 20 हजार, मध्यम उत्पन्न गटासाठी 50 ऐवजी 30 हजार आणि उच्च उत्पन्न गटात अर्ज करण्यासाठी 75 ऐवजी 40 हजार रुपये अनामत रक्कम भरता येईल. या सोडतीनंतर अर्जदारांना एकाच अनामत रकमेवर अनेक अर्ज भरता येतील, असे सामंत यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT