bhagat singh koshyari Sakal media
मुंबई

राज्यपालांचा शिवसेनेला दणका; 1 हजार 844 कोटींचा प्रकल्प चौकशीच्या घेऱ्यात

आश्रय योजनेची लोकायुक्तांकडून चौकशी

समीर सुर्वे

मुंबई : महानगरपालिकेच्या (BMC) सफाई कामगारांच्या (clean up marshal) वसाहतींच्या पुनर्विकाची (society redevelopment) आश्रय याेजना चौकशीत (Ashray yojana investigation) अडकली आहे. भाजपकडून आलेल्या तक्रारीनुसार (BJP compalint) राज्यपाल भगतसिंह काेश्‍यारी (Bhagat singh koshyari) यांनी लोकायुक्तांना (lokayukta) या प्रकरणाची चौकशी करण्याची सूचना केली आहे. (Bhagat singh koshyari gives order to lokayukta for investigation of bmc clean up marshals ashray yojana)

सफाई कामगारांच्या 39 वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या आश्रय योजनेत आता पर्यंत 1 हजार 844 कोटी रुपयांचे प्रस्ताव महापालिकेत मंजूर झाले आहेत. हे प्रस्ताव मंजूर होत असताना भाजपने त्यावर आक्षेप नोंदवला होता. त्यानंतरही प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर भाजपचे स्थायी समिती समिती सदस्य विनोद मिश्रा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन राज्यपालांनी या प्रकरणात लोकायुक्तांना चौकशी करण्याची सूचना केली आहे.

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी याबाबत पत्र पाठवुन विनोद मिश्रा यांना माहिती दिली आहे. मिश्रा यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने 17 डिसेंबर रोजी राज्यपालांची भेट घेऊन ही तक्रार केली होती. या वसाहतीच्या पुनर्विकासाच्या प्राथमिक प्रक्रियेने वेग घेतला आहे. कामागारांना स्थालांतरीत करण्याची सुरवात लवकरच होणार आहे. त्यासाठी कामगारांना विशेष अनुदानही देण्यात येणार आहे.

या योजने अंतर्गत 33 लाख चौरस फुटाचे बांधकाम करायचे ठरले होते. मात्र, कंत्राटदारांच्या इच्छेनुसार पालिकेने 79 लाख चौरस फुटाचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खर्चातही अनेक पटीने वाढ झाली. तसेच, या निवीदाही ठराविक कंत्राटदारांना काम मिळेल अशा पध्दतीनेच तयार करण्यात आल्या होत्या. सफाई कामगारांना चांगली घरे मिळायलाच हवी. पण, सफाई कामगारांच्या नावे भ्रष्टाचार केला जात असून त्याची चौकशी झालीच पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT