Gunratna Sadavarte News Sakal Digital
मुंबई

गुणरत्न सदावर्ते चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घरी पोहचले असून, त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गुणरत्न सदावर्तेंच्या घरी चार ते पाच पोलीस दाखल झाले असून, कोणतीही पूर्व नोटीस न देता आपल्याला चौकशीसाठी नेत असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले आहे. तसेच, चौकशीमध्ये पोलिसांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्यांना गुणरत्न अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Gunaratna Sadavarte Detained by mumbai Police)

दरम्यान, घरा बाहेर पडताना आपली हत्या होऊ शकते असे म्हणत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात माझ्या पत्नीने तक्रार दिलेली आहे. तर गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात जी कलमं दाखल झाली आहेत त्यामध्ये नोटीस देण्याची गरज नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी हजारो आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी हल्लाबोल केला होता. त्यामुळे या ठिकाणचे वातावरण काहीसे चिंताजनक बनले होते.

शरद पवारांच्या घरावर हल्ल्याप्रकरणी १०७ जणांवर गुन्हा दाखल

आज दुपारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवास स्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्लाबोल करत बंगल्यावर चप्पल आणि दगडफेक केली. दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी 107 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात 23 महिलांचाही सहभाग असल्याच समोर आलं आहे. दंगल परिस्थिती निर्माण करणे आणि षडयंत्र रचणे अशी विविध कलम लावून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT