मुंबई

खड्ड्यांमुळे डम्परखाली येऊन दुचाकीस्वार ठार

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : पावसाळा नुकताच संपला असला तरीदेखील पावसाळ्यात तयार झालेल्या खड्ड्यांवर अद्यापही प्रशासनाकडून कोणतीच पावले उचलली गेलेली नाहीत. दरम्यान या खड्ड्यांमुळे एका 22 वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.  भरधाव डम्परच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री शिळ-डायघर परिसरात घडली.

असीम सिद्दीकी (रा. तन्वरनगर, मुंब्रा) असे मृताचे नाव असून त्याच्या सोबत दुचाकीवर बसलेला त्याचा मित्र जखमी झाला आहे.

रस्त्यावरील खड्डयांमुळे हा अपघात झाल्याचा आरोप असीमचे पिता जावेद सिद्दीकी यांनी केला. दरम्यान अपघातानंतर डम्परचालक पसार झाला असून याप्रकरणी, शिळ-डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. संबधित प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT