मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगासह (UPSC) इतर आयोगाच्या परीक्षा आणि त्याची तयारी करणाऱ्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्याना (Minority students) हज हाऊसमध्ये राहत असलेल्या खोल्या सोडण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर संकट ओढवले असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत. (Haj house authorities gives order to minority students for leaving rooms)
केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या अधीन असलेले, हज हाऊस यूपीएससी निवासी मार्गदर्शन केंद्र, मुंबई येथे सुरू आहे. याठिकाणी देशभरातील सुमारे 100 आणि त्याहून अधिक विद्यार्थ्याना राहण्याची आणि अभ्यास करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येते. मात्र आता नवीन विद्यार्थी येथे येणार असल्याने जुन्या विद्यार्थ्यांनी आपल्या खोल्या सोडण्याचे आदेश हज हाऊस प्रशासनाने दिले असल्याने यावर विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. येथे सुमारे 200 विद्यार्थी राहू शकतात अशी व्यवस्था आहे, मात्र सध्या असलेल्या 60 विद्यार्थ्याना बाहेर काढून प्रशासन अन्याय करत असल्याचे महेबुब शेख या विद्यार्थ्याने सांगितले.
दरम्यान, हज समिती चे नवीन सीईओ याकूब शेख यांनी याबाबत सांगितले की, बरेच विद्यार्थी हे मागील चार वर्षांपासून राहत आहेत. त्यांना बाहेर करून नवीन विद्यार्थ्याना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा त्याची तयारी करण्यासाठी संधी देणे आवश्यक आहे.त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यातून कोणावरही अन्याय होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.