मुंबई

ठाण्यात पुन्हा फेरीवाल्यांचे बस्तान 

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : दोन आठवड्यापूर्वी शहरातील पदपथ अतिक्रमणमुक्त होण्यासाठी पालिकेच्या वतीने सलग चार दिवस कारवाई करण्यात आली होती. कारवाईला आठवडा उलटत नाही तोच पुन्हा फेरीवाल्यांनी शहरातील रस्ते आपल्याच मालकीचे असल्यागत कारभार सुरू केला आहे. त्यातही नौपाडा प्रभाग समितीमधील फेरीवाले यामध्ये आघाडीवर असल्याचे चित्र आहे. 

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील पदपथ किमान पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोकळे राहावेत, असे आदेश प्रभाग समितीस्तरावरील सहाय्यक आयुक्तांना दिले होते. त्यानंतर चार दिवस सलग कारवाई करून पदपथावरील अनेक लहान-मोठी बांधकामे तोडण्यात आली होती. तसेच फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई सुरू ठेवली होती. पण ही कारवाई थंडावल्यानंतर पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी बस्तान मांडण्यास सुरुवात केली आहे. 

शहरातील प्रवास वाहतूक कोंडीमुक्त होण्यासाठी रस्ते रुंदीकरण वारंवार करण्यात आले आहे. यासाठी शेकडो नागरिकांना विस्थापित करण्यात आले आहे. अशावेळी किमान मुख्य शहरातील पदपथ तरी पालिकेककडून मोकळे ठेवले जातील अशी अपेक्षा होती. पण पालिकेने शहरात सलग चार दिवस अतिक्रमण विरोधी कारवाई केल्यानंतरही फेरीवाल्यांनी रस्त्यांवर बस्तान मांडल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

मुख्य शहरातील पदपथ मोकळे ठेवण्याची मानसिकता पालिकेच्या अधिकाऱ्यांची राहिलेली नसल्याने या पदपथ अडविणाऱ्या फेरीवाले, दुकानदारांचे फावले आहे. महापालिकेच्या कारवाईनंतर रेल्वेस्थानक परिसर आणि नौपाडा येथील फेरीवाले काही प्रमाणात हटविण्यात आले होते. पण कारवाईचा हा फार्स थांबल्यानंतर पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी आपले बस्तान बसविण्यास सुरुवात केल्याने पालिकेला कारवाईत सातत्या ठेवावे लागणार आहे. 

कार डेकोरकडून रस्त्यांचा ताबा 
ठाण्यातील वंदना सिनेमागृहासमोरील रस्ता हा तर गॅरेजचालक आणि कार डेकोरच्या दुकानांसाठी वर्षानुवर्षे आंदण दिल्याच्या थाटात येथील दुकानदार आपला व्यवसाय करीत असतात. या दुकानात आलेल्या वाहनांनापैकी एखाद दुसऱ्या वाहनाला दुकानात जागा करून दिल्यानंतर येथील पदपथ आणि रस्ते सर्रास या दुकानदारांकडून अडवले जातात. वाहनांमधील सजावट जास्त प्रमाणात असल्यास काही वाहने तर दिवसभर याच रस्त्यावर पार्क केल्या जातात. नौपाडा प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांचे या दुकानदारांना अभय मिळत असल्यानेच या दुकानदारांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही, असा आरोप येथील नागरिकांकडून होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश मस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : ठाण्यातून नरेश म्हस्के आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर

T20 World Cup 2024 साठी भारताची प्लेईंग इलेव्हन; 'या' खेळाडूंना मिळणार अंतिम-11 मध्ये स्थान

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

Sharad Pawar : जनतेसाठी माझा आत्मा अस्वस्थ ; शरद पवार यांचे पंतप्रधान मोदी यांना प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT