मुंबई

Badlapur School Crime: माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रेच्या अटक पूर्व जामिनावर आज सुनावणी

Latest Badlapur News: गुन्हा दाखल झाल्यानंतर म्हात्रे यांनी अटकपूर्व जामिनासाठी कल्याण सत्र न्यायालयात धाव घेतली.

सकाळ वृत्तसेवा

Latest Crime News: सकाळ’च्या महिला पत्रकाराचा विनयभंग करणाऱ्या माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्यावर ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी अटक टाळण्यासाठी वामन म्हात्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या याचिकेवर गुरुवारी (ता. ३) न्या. संदीप मारणे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.

बदलापूर घटनेनंतर झालेल्या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या ‘सकाळ’च्या स्थानिक महिला पत्रकाराला वामन म्हात्रे यांनी अर्वाच्य भाषेत धमकावत विनयभंग केला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर म्हात्रे यांनी अटकपूर्व जामिनासाठी कल्याण सत्र न्यायालयात धाव घेतली.

सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. अटकेची टांगती तलवार कायम असतानाच दिलासा मिळावा, म्हणून म्हात्रेंनी अ‍ॅड. विरेश पुरवंत आणि अ‍ॅड. ऋषिकेश काळे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने त्यांना अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले आहे. गुरुवारी (ता. ३) होणाऱ्या सुनावणीवेळी महिला पत्रकाराच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra 12th Result 2026 : बारावीचा निकाल जाहीर! कोकण अव्वल, लातूर पिछाडीवर, मुलींचा यशाचा टक्का मुलांपेक्षा ६.३५ ने अधिक

Pune Bhor Child CCTV Video : पुण्यातील अत्याचार करून हत्या केलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला नेताना सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Mumbai Family Death Mystery : कलिंगडात विष नव्हतं, मग मृत्यू कसा झाला? मुंबईतील डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, FDA चा धक्कादायक अहवाल समोर

HSC Result: बारावीनंतर नोकरी करायची आहे ? रेल्वेमध्ये करा उत्तम करिअर, टीटीई होण्यासाठी अशी करा तयारी

Mumbai Crime: १,७४५ कोटी रुपयांचे कोकेन महामुंबईत जप्त, एनसीबीची सर्वात मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT