मुंबई

माणुसकीला काळिमा! नवजात बालकाला इमारतीवरून फेकलं अन्...

विजय गायकवाड

नालासोपारा: विरारमध्ये (Virar) एका नवजात बालकाला (Infant) अज्ञात व्यक्तीने बिल्डिंगवरून खाली फेकल्याची धक्कादायक (Shocking) घटना घडली. विरार पश्चिमेच्या यशवंत नगर परिसरातील ट्युलिप सोसायटीमध्ये (Tulip Society) मंगळवारी 12च्या सुमारास ही घटना घडली. यात बाळ (New born Baby) गंभीर जखमी (Seriously Injured) झाले असून त्याची प्रकृती चिंताजनक (Critical) असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत अर्नाळा (Arnala) सागरी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून एका संशयिताला ताब्यात घेऊन अधिकची चौकशी करत आहेत.

नक्की काय घडलं?

विरार पश्चिम यशवंत नगर हा परिसर उच्चभ्रू वस्तीचा आहे. याच परिसरातील ट्युलिप इमारतीच्या मोकळ्या आतील पॅसेजमध्ये एक नवजात बाळ आढळून आले आहे. स्थानिक नागरिकांना याची माहिती मिळताच बाळाला एका कपड्यात गुंडाळून तात्काळ नजीकच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले. तेथे त्या बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांने सांगितले आहे.

या घटनेची माहिती अर्नाळा सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एका संशयिताला ताब्यात घेत घटनेचा पंचनामा केला आहे. मात्र हे नवजात बाळ कुणी फेकलं हे, इमारतीच्या कितव्या मजल्यावरुन फेकल हे अजूनही स्पष्ट झाले नाही. इमारतीतील रहिवासी त्याला ओळखत नाहीत. अर्नाळा सागरी पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : मॉन्सून अंदमानमध्ये दाखल! ‘एल निनो’ची तीव्रता कमी होत असल्याचे निरीक्षण

Pune Fire News : पुण्यात PMPL बसला आग; परिसरात वाहतूक कोंडी

IPL 2024 RR vs KKR Live Score: राजस्थान-कोलकाता सामन्यात पावसाचा व्यत्यय; टॉसला उशीर

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Parli Bogus Voting Video : परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले...

SCROLL FOR NEXT