मुंबई

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत जोरदार सरी   

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात सोमवारी रात्री मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला असला, तरी पावसामुळे तिन्ही मार्गांवरील लोकलसेवा विस्कळित झाल्याने नोकरदारांचे हाल झाले. रात्री उशिरापर्यंत लोकल सुमारे अर्धा तास विलंबाने धावत होत्या. पावसाळ्यात लोकल सेवेवर परिणाम होणार नाही, हा रेल्वे प्रशासनाचा दावाही या पहिल्याच पावसात वाहून गेला. 

रात्री ९च्या सुमारास पडलेल्या या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कामांसाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेटसमुळे या कोंडीत भर पडली. मध्य रेल्वेवरील कोपर स्थानकात लोकलच्या पेंटाग्राफमधून रात्री ९.१० वाजता ठिणग्या उडाल्या. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली. रात्री उशिरापर्यंत ती सुरळीत झाली नव्हती.

पश्‍चिम रेल्वेवरही वांद्रे स्थानकात पेंटाग्राफ तुटल्याने लोकल तेथे सुमारे १५ मिनिटे थांबली होती. त्यापाठोपाठ अंधेरीतही तांत्रिक बिघाडामुळे लोकल रखडली. हार्बर मार्गावर वाशीला जाणाऱ्या लोकलमध्ये चुनाभट्टी स्थानकात बिघाड झाल्याने मार्गावरील वाहतूक सुमारे १५ मिनिटे ठप्प होती.

११ विमानांच्या मार्गात बदल
पावसामुळे मुंबई विमानतळावर येणारी ११ विमाने दिल्ली, अहमदाबादसह नजीकच्या विमानतळावर वळवण्यात आली आहेत. ढगाळ वातावरणामुळे मुंबईची दृष्यमानता कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. 

आज वादळाचा प्रभाव
अरबी समुद्रात तयार होणाऱ्या वादळामुळे मंगळवारपासून (ता. ११) मुंबईसह कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाची शक्‍यता आहे. ठाणे, रायगडमध्येही गडगडाटासह पाऊस बरसेल, असा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. मंगळवारी सिंधुदुर्ग-रत्नागिरी किनारपट्टीवर ताशी ५० ते ६० कि.मी. वेगाने तर बुधवारपासून मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर ताशी ७० कि.मी. वेगाने वारे वाहण्यास सुरुवात होईल. पुढील दोन दिवस वादळाचा प्रभाव राज्याच्या किनारपट्टीवर दिसेल. बुधवारी रात्री या वादळाचा वेग सर्वाधिक म्हणजे ताशी १५५ कि.मी.पर्यंत पोहचेल. याचा सर्वाधिक प्रभाव गुजरातच्या पोरबंदरपासून महुवा किनारपट्टीदरम्यान बसणार आहे. त्यामुळे पालघरच्या किनारपट्टीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

बुडणाऱ्या तरुणाला वाचवले 
गिरगाव चौपाटीवर बुडणाऱ्या विशाल भोगवले (२०) या तरुणाला पालिकेच्या जीवरक्षकांनी सोमवारी सायंकाळी वाचवले. तो किनाऱ्यापासून १०० फुट खोल समुद्रात बुडत होता. त्याला उपचारासाठी मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Fact Check: 'गर्दी फक्त पाहायला येते, मतदानाला नाही...' खोट्या दाव्यासह कंगनाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Hybrid Pitch In Dharamshala : हायब्रिड खेळपट्टी म्हणजे काय? धरमशालामध्ये करण्यात आले अनावरण! मुंबईसह 'या' मैदानावर लवकरच होणार प्रयोग

Latest Marathi News Live Update : अमित शहांनी बोरिवलीमध्ये भाड्याने घर घेतलंय- संजय राऊत

IPL 2024 DC vs RR : राजधानी 'दिल्ली'साठी आर या पार...! प्लेऑफमध्ये टिकून राहण्यासाठी आज राजस्थानवर विजय आवश्यक

SCROLL FOR NEXT