soyaban.jpg
soyaban.jpg 
मुंबई

वाशी तालुक्यात अतिवृष्टी; सोयाबीन पिकाचे नुकसान

नेताजी नलवडे

वाशी ः तालुक्यात शुक्रवारी व शनिवारी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील तिन्ही महसूल मंडळात अतिवृष्टी आहे. सकाळी आठपर्यंत संपलेल्या गेल्या 24 तासांत तालुक्यात सरासरी 78 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला.

खरीप हंगामाचे उत्पन्न शेतकऱ्यांच्या हातून गेल्यानतंर तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारच्या पहाटेपर्यं कमी -अधिक प्रमाणात पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी हंगाम पदरात पडण्याच्या आशा पल्लवीत झाल्या असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वाशी महसूल मंडळात ८२, पारगाव मंडळात ७० तर तेरखेडा मंडळात ८२ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला.

तालुक्यात सध्या सोयाबीन पिकाच्या काढणीची कामे सुरु आहेत. सोयाबीन पिकाच्या काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने काढणी कशी करावी या चिंतेत शेतकरी असतानाच शुक्रवारी रात्री पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी सोयाबीनच्या काढाची पसर शेतातच असल्याने झालेल्या पावसामुळे हे सोयाबीनचे काढ भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
या पावसामुळे सोयाबीन उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले असले तरी या पावसामुळे जमिनीतील पाणीपातळी वाढण्यास मदत होणार असल्याने व या पावसाचा फायदा रब्बी हंगामासाठी चांगला होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Fact Check: पूजेच्या साहित्यावर जीएसटी सूट देण्यास काँग्रेसने विरोध नाही, फेक पोस्ट होताहेत व्हायरल

Deepfake Detector : आता डीपफेक व्हिडिओ ओळखणं झालं सोपं; 'ओपन एआय' कंपनीने लाँच केलं नवीन टूल

Latest Marathi News Live Update : 'अशा बिनकामाच्या गोष्टींवर मोदी नक्कीच बोलतील..'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याबाबत प्रियांका गांधींची प्रतिक्रिया

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT