मुंबई

एअरटेल ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी..

सकाळवृत्तसेवा

मुंबई - तुम्ही एअरटेलचे ग्राहक आहात, तुमच्या घरात किंवा मित्रमंडळींपैकी कुणी AirTel चं कार्ड वापरतं ?  मग ही बातमी तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्रपरिवारासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. एअरटेल कंपनीने त्यांच्या पोस्टपेड आणि ब्रॉडबँड प्लानसोबत मोफत दिली जाणारी अत्यंत मोठी आणि ग्राहकांकडून आनंदाने वापरली जाणारी मोफत सुविधा काढून घेतलीये. 

मोठी बातमी - ​"शिवसेनेने ठरवले तर भाजपला मुंबईत फिरणे अशक्‍य"

भारती एअरटेलने आपल्या काही पोस्टपेड आणि ब्रॉडबँड ग्राहकांना ३ महिन्यांचे मोफत  नेटफ्लिक्स सब्सक्रिप्शन दिलं होतं. या संबंधीची माहिती कंपनीने त्यांच्या वेबसाईटवर देखील दिली होती. मात्र यापुढे कंपनी मोफत तीन महिने नेटफ्लिक्स सुविधा देणार नाहीये. AirTel च्या ब्रॉडबँड किंवा पोस्टपेड मोबाईल सिमकार्ड धारकांना नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम, Zee5 या सारखे OTT अप्लिकेशन मोफत वापरता येत होते. दरम्यान याबाबतची माहिती आता Air Tel च्या वेबसाईट वरून देखील हटवण्यात आली आहे.

AirTel चे प्रतिस्पर्धी vodafone किंवा jio अजूनही अशा प्रकारच्या सुविधा आपल्या ग्राहकांना देतायत. अशात Air Tel ने मात्र आता ही सुविधा देणं बंद केलंय. यामध्ये एकच दिलासादायक माहिती म्हणजे, जे या सुविधेचा सध्या वापर करतायत त्यांना ही सुविधा व्हॅलिडिटी संपेपर्यंत वापरता येणार आहे. 

henceforth air tel will not offer free netflix service to their new postpaid and broadband costumers

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: पैठणमध्ये पराभूत उमेदवारांचा वाद हिंसक; नेहरू चौकात दगडफेक, पाच जण जखमी

Beed Election Result 2025: बीडमध्ये कधी नव्हे तेच भाजपला आघाडी! तरुण नेत्याचा करिष्मा पण तगडी फाईट सुरु

BMC Election: बीएमसी निवडणुकीत शिंदेसेनेला मशालीपेक्षा ‘पतंग’ची भीती? नवे राजकीय वादळ उठणार,गणित बिघडवणार!

Jaysingpur Nagar Palika News : राजू शेट्टी, सतेज पाटील, धनंजय महाडिक, गणपतराव पाटील विरोधात पण, जयसिंगपुरात यड्रावकरांचा दबदबा कायम

Trimbakeshwar election Result: कुंभमेळ्याच्या भूमीत प्रचाराचा नारळ फोडला, पण निकालात उलट चित्र; त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपचं कुठं चुकलं?

SCROLL FOR NEXT