मुंबई

गृहमंत्री अनिल देखमुख भडकलेत, 'त्या' सर्वांना दिली कडक शब्दात तंबी...

सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनाच्या पार्शवभूमीवर मुंबईत सैन्य तैनात करण्यात येणार असल्याची अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिला. अनिल देशमुख यांनी ट्विट केले की, गृह मंत्रालयाच्या लक्षात आले आज की, काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्ती नागरिकामध्ये दहशत आणि असंतोष निर्माण करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटर इत्यादी सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर बनावट बातम्या आणि अफवाची एक मोहीम चालवत आहेत. कोरोना महामारी ही देश आणि महाराष्ट्राच्या समोर उभी ठाकलेली एक मोठी सार्वजनिक आरोग्य आपदा आहे. अशा परिस्थितीत अफवा पसरवली जात आहे. ज्यामध्ये भारतीय सैन्य मुंबई व इतर शहरांवर संपूर्ण संचार बंदी लागू करण्यासाठी तैनात होणार आहे.

या संदेशामध्ये लोकांना या कालावधीत भाजीपाला, किराणा आणि दूध यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यास सांगितले जात आहे. ही बातमी बनावट असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

“नागरिकांनी अशा संदेशांवर विश्वास ठेवू नये किंवा त्यांना फॉरवर्ड करू नये, कारण यामुळे समाजात उगाचच घबराट पसरते. महाराष्ट्र सरकार कोविड -19 विरुद्ध लढाईस वचनबद्ध आहे आणि या  लढ्यातील धोरणात्मक निर्णयाबाबत नागरिकांना वेळोवेळी राज्य सरकार विश्वासात घेत आले आहे,  “अशा अफवा पसरवल्यास आयटी कायदा आणि आयपीसी या दोन्ही तरतुदी नुसार दंड आणि शिक्षा होऊ शकते. महाराष्ट्र सायबर विभाग या मुद्दयाकडे बारकाईने पहात आहे आणि यापूर्वीच त्यांनी अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे.

”महाराष्ट्र सायबर विभागाच्या चौकशीत असे आढळले आहे की विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील 12 मुख्य यूझर आयडी 8 मे 2020 पासून आजपर्यंत या अफवा / बनावट बातम्या पसरवत आहेत.  अशा  हँडल विरुद्ध सीआरपीसी सेक्शन 149 अंतर्गत कायदेशीर चेतावणी देण्याच्या स्वरूपात महा सायबरने यापूर्वीच नोटिसा पाठवल्या आहेत. एफबी, ट्विटर या सारख्या प्लॅटफॉर्मवरील पोस्ट काढून घ्या, असे आवाहन करत देशमुख यांनी अशा लोकांची खाती स्थगित करण्याचे आदेश दिले असून संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

देशमुखांनी असंही केलं अधोरेखित : 

देशमुखांनी असंही अधोरेखित केलं की: "राज्याचा गृहमंत्री म्हणून माझा ठाम विश्वास आहे की महाराष्ट्र पोलिस कोणत्याही उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्यास सक्षम आहेत."

home minister anil deshmukh on deputing military in mumbai read full news 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Tariff : डोनाल्ड ट्रम्प यांचा जपान अन् दक्षिण कोरियाला मोठा धक्का! ; २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा

Modi Government and Farmers : शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! ; कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली मोठी माहिती, 'आता लवकरच...'

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT