Walase Patil_All Party Meet 
मुंबई

सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेबाबत गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात अचानक घुसलेल्या कार प्रकरणावरही गृहमंत्र्यांनी भाष्य केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या हॉटेल प्रकरणानंतर त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली होती. त्यांच्या या तक्रारीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे भाष्य केलं आहे. (Home Minister Dilip Walase response to Sadabhau Khot security issue)

वळसे म्हणाले, शरद पवार आमचे नेते असून आम्ही कायमच त्यांना भेटत असतो. काही विषय त्यांच्या कानावर घालायचे असतात त्यानुसार आजची आमची भेट ठरलेली होती. त्यामुळं या बैठकीत विशेष काही चर्चा झालेली नाही. दरम्यान, सदाभाऊ खोत यांच्या तक्रारीबाबत बोलताना ते म्हणाले, "सदाभाऊ खोत यांच्या जीविताला काही धोका आहे असं मला वाटत नाही. पण तरीही त्यांच्या तक्रारीनुसार मी राज्याच्या पोलीस प्रमुखांना सूचना दिल्या आहेत की त्यांची सुरक्षा वाढवण्यात यावी"

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात जाणीवपूर्वक काही घडलेलं नाही - वळसे

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात अचानक घुसलेल्या कार प्रकरणी वळसे म्हणाले, "ही घटना अनावधानानं घडलेली घटना आहे आम्ही याची संपूर्ण चौकशी केली यात दुसरा काही प्रकार नव्हता. त्यामुळं या प्रकारला फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. अर्थात पोलीस यंत्रणेकडून जो बंदोबस्त पाहिजे होता त्यात ते कमी पडलेत का? याचा आम्ही तपास करतोय. जाणीवपूर्वक यामध्ये काही घडलं असेल असं वाटत नाही जाणीवपूर्वक काही घडलं असेल तर कारवाई करणं ठीक आहे अन्यथा गरजेचं नाही"

विधानपरिषदेत महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील

विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष वेगवेगळे तयारी करत आहेत. राज्यसभेवेळी परिस्थिती वेगळी होती, सध्या विधानपरिषदेची परिस्थिती वेगळी आहे. यावेळी महाविकास आघाडीचे सहाच्या सहा उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT