मुंबई

Video | 17 फ्रॅक्चर्स आणि ती बिचारी दवाखान्यात, अंगावर शहारा आणणारी घटना

सकाळ वृत्तसेवा

गाड्या चालवता येत नसतील तर लोकं गाड्या चालवतात कशाला? समोरून कुणी येतंय जातंय का ? हे डोळे उघडे ठेऊन लोकं बघत का नाहीत ? तुमच्या एका चुकीने कुणाचं आयुष्य उध्वस्त होईल याची फिकीर लोकांना नसतेच का ? आता 'ती' कशी आहे. आहे का नाही इथवर.. एक ना अनेक प्रश्न तुमच्या डोक्यात  आल्याशिवाय राहणार नाही. त्या माणसाला धरून बदडायला पाहिजे हे सगळ्यात आधी तुमच्या डोक्यात येईल. कारण, ही घटना पण तशीच आहे.. खालचा व्हिडीओ एकदा पाहा म्हणजे तुहाला समजेल आम्ही असं का म्हणतोय ? 

सदर दुर्घटना ही मंगळवारी (तारीख ५) घडली आहे. पनवेलच्या कळंबोलीत साईनगर वसाहतीतील एका सोसायटीच्या आवारात ही दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे ही मुलगी अवघ्या 6 वर्षांची आहे. सध्या या मुलीला कामोठे इथल्या MGM इस्पितळात दाखल करण्यात आलंय. गंभीर बाब म्हणजे या मुलीला 17 ठिकाणी फ्रॅक्चर झालंय. दरम्यान या घटनेत कोणतीही तक्रार पोलिसांमध्ये दाखल करण्यात आलेली नाही. 

या गाडीवर 'L' म्हणजेच लर्निंग अशी पाटी दिसतेय. अशात जर चालक शिकाऊ असेल तर मुळात शेजारी कुणीतरी असा व्यक्ती हवा ज्याला गाडी नीट चालवता येते किंवा ज्याच्याकडे गाडी चालवण्याचा पक्का परवाना आहे . पण तसं कुणीच या गाडीत नीट दिसत नाहीये. मग अशा लोकांचं आता करायचं काय हा खरा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतंय? कळवा कमेंटमध्ये.  

WebTitle : horrible accident took place in panvel kalamboli area

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT