daru 2.jpg 
मुंबई

ठाण्यात दारु विक्रीबाबत हॉटेल अँड रेस्टॉरन्ट असोशिएशनचा मोठा निर्णय

दीनानाथ परब

कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी घातलेल्या निर्बंधांचा हॉटेल उद्योगावर विपरित परिणाम होत आहे. या निर्बंधांचा निषेध म्हणून हॉटेल अँड रेस्टॉरन्ट ओनर्स असोशिएशनने ठाणे जिल्ह्यात दारु विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मागण्यापूर्ण होत नाहीत, तो पर्यंत दारुविक्री बंद ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. रात्रीच्या संचारबंदीमुळे हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान होतेय. हॉटेल मालकांनी रात्री आठनंतरही हॉटेल सुरु ठेवण्याची परवानगी मागितली आहे. 

कोरोनाच्या साथीमुळे आधीच उद्योगाला फटका बसला आहे. हॉटेल मालकांनी हॉटेल व्यवसायाला दिलासा देण्याची मागणी सरकारकडे केली आहे तसेच उत्पादन शुल्कही हप्त्यामध्ये भरण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली आहे. मागण्या पूर्ण होत नाहीत, तो पर्यंत ठाणे शहर, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबई आणि अन्य भागात दारु विक्री करु देणार नाही, असे हॉटेल अँड रेस्टॉरन्ट ओनर्स असोशिएशनने म्हटले आहे. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे. 

राज्यात १५ एप्रिलपर्यंत रात्री आठ ते सकाळी सात अशी संचारबंदी लावण्यात आली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्याचा त्यामागे उद्देश आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानांनाच या काळात विक्रीची मुभा आहे. कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली, तर लॉकडाउन करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी ४,३७१ कोरोनाबाधितांची नोंद झाली. सध्या ठाण्यात ३४ हजार ७१७ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सुप्रीम कोर्टाचा मोठा ‘गेमचेंजर’ निर्णय! ‘तारीख पे तारीख’चा खेळ थांबवला! काय आहे नवा फॉर्म्युला?

संजू सॅमसनला पुढचा MS Dhoni होण्याची गरज नाही, तो...! गौतम गंभीरच्या विधानाची चर्चा; शशी थरूर यांच्या वक्तव्यावर दिलं उत्तर

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत गुढीपाडव्याचा उत्साह ; महिलांची भव्य बाईक रॅली

Ashok Kharat Case : महिलांच्या शोषणासाठी अशोक खरातला आयोगाच्या अध्यक्षांचेच अभय ? रुपाली पाटील ठोंबरे यांच्या दाव्याने खळबळ

'मी दारु पिणं सोडलं, कारण...', भारतीय स्टार क्रिकेटरने IPL 2026 पूर्वी घेतला मोठा निर्णय; सर्वकाही स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT