मुंबई

माथाडी कामगारांचे १०० कोटी लाटले; शशिकांत शिंदेंचा गौप्यस्फोट

सकाळ वृत्तसेवा

 
नवी मुंबई : माथाडी कामगारांचे विविध राष्ट्रीय बॅंकांमध्ये ठेवी स्वरूपात असलेल्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी बॅंकांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने केली आहे. माथाडी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारकडे आपण चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. राज्यभरातील पाच माथाडी बोर्डांतील तब्बल ५० हजार कामगारांच्या १०० कोटी रुपयांचा अपहार विविध बॅंकांमधील टोळ्यांनी केल्याचा गौप्यस्फोट शिंदे यांनी केला.

दि रेल्वे गुड्‌स क्‍लिअरिंग ॲण्ड फॉरवर्डिंग एस्टॅ. लेबर बोर्ड, धातू व कागद बाजार आणि दुकान कामगार मंडळ, मुंबई लोखंड व पोलाद कामगार मंडळातील कामगारांचा भविष्य निर्वाह निधी, उपदानाच्या रकमा विविध राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये मुदत ठेवी स्वरूपात ठेवल्या होत्या. माथाडी कामारांच्या मंडळांनी जेव्हा बॅंकांकडे मुदत ठेवीच्या रकमांची मागणी केली, तेव्हा त्या रकमा काढून घेतल्या असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. मंडळाला माहिती नसतानाही बॅंकांनी रकमा कशा गायब केल्या, असा प्रश्‍न मंडळांनी बॅंकांना विचारला. याप्रकरणी काही ठिकाणी गुन्हेे दाखल झाल्यावर कामगार मंडळांचे खोटे लेटरहेड, शिक्के व बनावट सह्यांच्या आधारे  कोट्यवधी रुपये काढल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी विविध कामगार आयुक्तांनी पोलिसांत धाव घेतल्यानंतर तपास सुरू झाला आहे.

आतापर्यंत उघड झालेला अपहार
माथाडी कामगार बोर्डाने मोठ्या विश्‍वासाने राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये घामाचा पैसा ठेवल्यानंतरही तो सुरक्षित नसल्यामुळे राज्यभरातील माथाडी कामगारांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत उघडकीस आलेल्या प्रकरणात दि रेल्वे गुड्‌स क्‍लिअरिंग ॲण्ड फॉरवर्डिंग एस्टॅब्लिशमेंट यांचे २२ कोटी, मुंबई लोखंड व पोलाद कामगार मंडळाचे ३५ कोटी, कापड बाजार व दुकाने मंडळाचे पाच कोटी आणि धातू व कागद बाजार दुकाने यांच्या १८ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 10 नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त

SCROLL FOR NEXT