crime
crime esakal
मुंबई

Dombivali Crime : बैलगाडा शर्यत आणि दारुच्या व्यसनापायी पत्नीला पतीची मारहाण; दोन गटांत मारामारी

शर्मिला वाळुंज

पत्नीकडे दारुसाठी त्याने पैसे मागितले, तीने ते न दिल्याने पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण शीळफाटा रोडवरील काटई गावात घडली.

डोंबिवली - पतीला बैलगाडा शर्यत आणि दारुचे व्यसन असल्याने पगार तो सगळ्या त्यावरच उडवित असे. पत्नीकडे दारुसाठी त्याने पैसे मागितले, तीने ते न दिल्याने पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण शीळफाटा रोडवरील काटई गावात घडली आहे. प्रतिक्षा चौधरी (वय 24) हिला मारहाण झाली असून यामुळे प्रतिक्षा हिच्या सासरची मंडळी व माहेरच्या मंडळीत हाणामारी झाली. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात परस्पर विऱोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

काटई येथे राहणारी प्रतिक्षा हिचा पती सागर चौधरी याला दारुचे आणि बैलगाडा शर्यतीचे व्यसन आहे. मिळणारा पगार तो बैलगाडा शर्यत आणि दारुवर उधळीत असे. पत्नी प्रतिक्षाकडे त्याने पैशांची मागणी केली असता तिने पैसे न दिल्याने सागरने तिला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. प्रतिक्षा हिने वडिलांना फोन करुन आपल्याला पतीने मारहाण केल्याचे सांगितले. वडिलांनी मी घरी येतो असे सांगितले त्यानंतर प्रतिक्षाच्या सासरच्या मंडळींनी तिला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर तिचे वडील अनंता त्या ठिकाणी जखमी मुलीला पाहून त्यांनी तात्काळ तिस मानपाडा पोलिस ठाण्यात घेऊन गेले. तेथून उपचारासाठी प्रतिक्षा हिला शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले.

प्रतिक्षा हिच्या तक्रारीवरुन मानपाडा पोलिस ठाण्यात सागर चौधरी, रमेश चौधरी, जिजाबाई चौधरी, शरद चौधरी, रेणूका चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रमेश चौधरी यांच्या फिर्यादीवरुन त्यांच्या मुलाने सुनेस मारहाण केल्याचा राग मनात धरुन अनंता भोईर व मोहीत भोईर यांनी त्यांना मारहाण केली. याप्रकरणी अनंता व मोहीत भोईर यांच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT