मुंबई

मुंबईत पतीकडून पत्नीची हत्या; दोन वर्षांपूर्वी झालेला प्रेमविवाह

सुरज सावंत

२०१९ मध्ये आरोपी हसनने नेहाला पळवून नेले होते.या प्रकरणी नेहाच्या आईने हसन विरोधात जुहू पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

मुंबईत पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. अंधेरीतील डीएन नगर परिसरात ही घटना घडली असून या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. नेहा गंगासागर गुप्ता(२०) असे या मृत महिलेचे नाव असून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, डीएन.नगर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी पती हसन अब्दुल पठान याला अटक केली आहे. नेहा आणि आरोपी हसन यांची ओळख २०१४ मध्ये झाली होती. २०१९ मध्ये आरोपी हसनने नेहाला पळवून नेले होते.या प्रकरणी नेहाच्या आईने हसन विरोधात जुहू पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

नेहा आणि हसन यांच्यात काही काळाने सतत वाद व्हायला लागल्यानंतर नेहा आईच्या घरी परतली होती. ५ मे २०२१ रोजी नेहा कामावरून तिच्या घरी न जाता हसनच्या घरी गेली होती. तेथे दोघांमध्ये वाद झाला. याच वादातून हसनने नेहावर चाकूने वार केले. रक्ताच्या थारोळ्यात नेहा पडल्यानंतर आरोपी हसनने घराला टाळा मारून पळ काढला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपी हसनला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT