If the tolls are not withdrawn Burn the toll naka plaza mns Raj Thackeray warning esakal
मुंबई

Mumbai : टोल मागे न घेतल्यास नाके जाळून टाकू; राज ठाकरे यांचा इशारा

राज ठाकरे यांचा इशारा; राजकारण्यांचे उदरनिर्वाहाचे साधन असल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘टोल हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा गैरव्यवहार आहे, टोल मागे न घेतल्यास टोलनाके जाळून टाकू,’’ असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी दिला. टोलनाके हे राजकारणातल्या अनेक लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन आहे.

त्यांच्याकडे दर दिवसाला, आठवड्याला, महिन्याला यातून पैसे जात असतात असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला. त्यानंतर राज्यातील अनेक टोलनाक्यांवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी राज्यातील टोलनाक्यांवर आक्रमक पवित्रा जाहीर केला. टोलमाफीबाबत विविध राजकीय नेत्यांनी कशा प्रकारे आश्वासने दिली होती, याचे व्हिडिओही त्यांनी दाखविले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चारचाकी आणि छोट्या गाड्यांना टोल नसल्याचे शिवाय अलीकडेच सांगितले होते. त्याचाच आधार घेत राज ठाकरे यांनी ‘राज्यात कुठे आहे टोलमाफी, असा सवाल करत फडणवीस यांचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न केला.

‘‘फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार चारचाकी आणि छोट्या वाहनांना टोलमाफी असले तर मग, आमची माणसे प्रत्येक टोलनाक्यावर उभी राहतील. या वाहनांवर टोल आकारला दिला जाणार नाही. याला विरोध करायचा प्रयत्न केला तर टोलनाके जाळून टाकू,’’ असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला. 

मनसेने २००९-१०मध्ये टोलविरोधात आंदोलन सुरू केल्यापासून प्रत्येक राजकीय पक्षाने टोलमुक्तीची घोषणा केल्याचे सांगत राज ठाकरे यांनी सर्व नेत्यांच्या टोलमाफीचे व्हिडिओच सादर केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चित्रफिती ऐकविल्या.

केवळ जड वाहनांना टोल : फडणवीस

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज टोलमाफीबाबतचा प्रश्न मांडताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात मोटार, जीपवर कोणतेही शुल्क आकारले जात नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

ते म्हणाले,‘‘ शासनाने टोलसंदर्भातील निर्णय यापूर्वीच घेतला आहे. मोटार, जीप आणि एसटी महामंडळाच्या बसगाड्यांना पथकरातून सवलत देण्यात आली आहे. याबद्दलची परताव्यापोटीची रक्कम शासनातर्फे दिली जात आहे. अन्य जड वाहनांवर मात्र शुल्क आकारले जात आहे’’, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT