मुंबई

सीसीआयएमच्या अधिसूचनेविरोधात आज IMA ची निदर्शने

मिलिंद तांबे

मुंबई, ता. 8 : सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनने (सीसीआयएम) राजपत्रात प्रकाशित केलेल्या अधिसूचनेविरूद्ध लढा देण्याचा निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशनने घेतला आहे. त्याविरोधात इंडीयन मेडीकल असोसिएशन आज (ता.8) रोजी राज्यभर निदर्शने करणार आहे. आजपासून या आंदोलनाला सुरूवात झाली असून सार्वजनिक ठिकाणी प्रत्येक शहर आणि गावात सर्व आयएमएचे सदस्य शांततामय निदर्शने करणार असल्याचे आयएमए ने स्पष्ट केले आहे.

तर 11 डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतभरात वैद्यकीय सेवा बंद करण्यात येतील. शुक्रवारी ता. 11 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या दरम्यान सर्व अत्यावश्यक नसलेल्या सेवा कोव्हीड सेवा वगळता बंद राहतील. आपत्कालीन सेवा, अपघात, प्रसूतीगृहे, आपत्कालीन शस्त्रक्रिया या सेवा सुरु राहतील असे कळवले आहे.

सीसीआयएमची ही अधिसूचना आणि त्याचे हानिकारक थेट परिणाम भावी डॉक्टरांवर होणार आहे. महाराष्ट्रातील 36 शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधील  सुमारे 20 हजार वैद्यकीय विद्यार्थ्यांचा समावेश असणा-या सीसीआयएम ही संघटना देखील शांततामय निदर्शने करतील असा इशारा आयएमएने दिला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातील 150 सरकारी आणि खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना समाविष्ट करणाऱ्या डॉक्टरांची ज्युनिअर डॉक्टर्स नेटवर्कही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. याशिवाय या आंदोलनास महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर्स - मार्ड- यांनी पाठिंबा दर्शविला आहे. 

केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास आयएमए नॅशनल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करेल आणि  सर्व आयएमए राज्य शाखा संबंधित उच्च न्यायालयांमध्ये आणि काही स्थानिक IMA शाखा संबंधित जिल्हा न्यायालयांमधील खटले दाखल करतील असा इशाराही देण्यात आला आहे.

सीसीआयएमने 20 नोव्हेंबर रोजी काढलेल्या सूचनेत एकूण 58 शस्त्रक्रिया कार्यपद्धती, जनरल सर्जरी, युरॉलॉजी (मूत्ररोग शस्त्रक्रिया), सर्जिकल गॅस्ट्रोएंटरॉलॉजी, ( पोटाच्या आणि आतड्याच्या शस्त्रक्रिया) इ.एन.टी. (नाक-कान-घसा), ऑफ्थाल्मोलॉजी (नेत्ररोग शस्त्रक्रिया) आणि डेंटिस्ट्री (दंतरोग शास्त्रक्रिया) यांचा समावेश आहे.

IMA to start agitation againt notification issued by central council of indian medicine

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT