मुंबई

दहशतवादी हल्ल्यांचा पर्यटन क्षेत्राला फटका 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : दहशतवादी हल्ल्यांमुळे जगभरातील पर्यटकांमध्ये सध्या भीतीचे सावट पसरले आहे. देशातील पुलवामा आणि आता श्रीलंकेतील दहशतवादी हल्ला यामुळे दक्षिण-पूर्व आशियातील पर्यटनावर परिणाम झाला असून, अनेक पर्यटकांनी आपले बुकिंग रद्द केले आहे. एप्रिल-मे हा सुट्टीचा हंगाम भारतीय पर्यटकांबरोबर परदेशी पर्यटक दक्षिण-पूर्व आशियातील देशांना भेट देतात. मात्र, हल्ल्यामुळे पर्यटनावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

एप्रिल-मे हे दोन महिने भारतीय पर्यटन कंपन्यांसाठी सुगीचे दिवस असतात. यावर्षी या महिन्यांमध्येच पर्यटन कंपन्यांना सर्वाधिक आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. जेट एअरवेज विमान सेवा बंद पडल्याने विमान प्रवासाच्या दरांनी मोठा उच्चांक गाठला. त्याचा परिणाम टुरिस्ट पॅकेजवर झाला. भारताजवळील पर्यटन स्थळ म्हणून श्रीलंकेचा पर्याय पर्यटन कंपन्या पर्यटकांना देत होते. लोकांना हा पर्याय आवडत होता. विमानाचे दर भडकल्याने अनेक पर्यटकांनी श्रीलंकेला पसंती दिली होती. मात्र, 23 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पर्यटनासाठी निवडलेला श्रीलंका हा पर्याय आता अनेकांनी बदलला आहे.

परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात या हंगामात दक्षिण-पूर्व आशियातील देशांना भेट देतात. परदेशी पर्यटकांमध्ये दहशतवादी हल्ल्यामुळे भीती निर्माण झाली आहे. त्यांनीदेखील दक्षिण-पूर्व आशियातील बुकिंग रद्द केले आहे, अशी माहिती राजा राणी ट्रॅव्हल्सचे संचालक विश्वजीत पाटील यांनी दिली. श्रीलंकेत जाणारे पर्यटक 10 टक्के होते. हल्ल्यानंतर पर्यटकांनी श्रीलंकेचे बुकिंग रद्द केले. तसेच चौकशीसाठीही फोन येणे बंद झाले आहे, असे त्यांनी सांगितले. 

जेटमुळे आधीच पर्यटन कंपन्यांची परवड होत आहे. आता श्रीलंका दहशतवादी हल्ल्यामुळे त्याच्यात आणखी भर पडली. आमच्याकडील पर्यटकांना श्रीलंका हा पर्यटनासाठी पर्याय देत होतो. आता तोही पर्याय गेला. पर्यटकांना तेथे जाण्यास रस नाही. पर्यटकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. 
- हिमांशू पाटील, संचालक, केसरी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT