मुंबई

नवीन वाहनांवरील करासंदर्भात परिवहन आयुक्तांचा महत्त्वाचा निर्णय, तुम्हाला किती कर लागणार ? वाचा

प्रशांत कांबळे

मुंबई,ता.27: मोटार वाहन कायद्यांतर्गत 2017 मध्येच नवीन वाहनांच्या किंमतीची व्याख्या बदलवून नव्याने वाहनांचे दर निश्चित केले आहे. त्यानुसार आरटीओ कार्यालयात नवीन दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी खासगी वाहनांकडून सुधारित दराप्रमाणेच कर वसुली करणे अनिवार्य आहे. मात्र, अनेक आरटीओ कार्यलयात जुन्याच दराप्रमाणे कर वसूल केला जात असल्याचे परिवहन आयुक्त कार्यालयाच्या निदर्शनास आल्याने पुन्हा एकदा नवीन दरानेच कर वसुली करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे.

वाहनांचे कर निर्धारण व आकारणी महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम आणि त्याखालील नियमातील तरतुदीनुसार केले जाते. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम, 1958 अंतर्गत 2017 मध्येच सुधारणा करुन वाहनाची किंमतीची व्याख्या नव्याने समाविष्ट केली होती. मात्र अद्यापही काही कार्यालयांमध्ये दुचाकी व चारचाकी वाहनावरील एकरकमी कराच्या निर्धारणेमध्ये संभ्रमाची स्थिती असल्याचे आयुक्त कार्यालयाच्या निदर्शनास आले आहे.

त्यामुळे आधीच निर्धारित केलेल्या व्याख्येनुसार दुचाकी तिनचाकी आणि चारचाकी खाजगी वाहनांची कर वसूली करण्यासाठी पुन्हा आदेश देण्यात आले आहे. यामध्ये वाहनाची किंमत याचा अर्थ भारतामध्ये निर्मिती केलेली वाहने, एकतर वाहनाचा निर्माता किंवा वाहन विक्रेता यांनी दिलेल्या वाहनाच्या खरेदी बीजकात नमूद केलेल्या अंतिम किंमतीनुसार असलेली किंमत, असा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्या किंमतीमध्ये, मुळ निर्मितीची किंमत, केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम 2017, केंद्रीय वस्तू व सेवा कर (सीजीएसटी), एकात्मिक वस्तू व सेवा कर अधिनियम 2017  (IGST), राज्याचा वस्तू व सेवा कर, उपकर आणि महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम, आणि जर वाहनाची इतर कोणत्याही राज्यातून किंवा संघ राज्यक्षेत्रातून महाराष्ट्र राज्यात विक्री करण्यात आली असेल तर, अशा राज्यात किंवा संघ राज्यक्षेत्रात भरलेला वस्तू व सेवा कर यांचा समावेश राहणार असल्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी आदेशात स्पष्ट सांगितले आहे.

Important decision of Transport Commissioner regarding new vehicle tax how much tax will you have to pay

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT