चिन्ह वापरून त्यावर ‘स्वॅगवाला भाई’, ‘बडा भाई’, ‘छोटा भाई’, ‘प्यारा भाई’ असे शब्द कोरलेल्या अनेक प्रकारच्या राख्या ऑनलाईन उपलब्ध आहेत.
चिन्ह वापरून त्यावर ‘स्वॅगवाला भाई’, ‘बडा भाई’, ‘छोटा भाई’, ‘प्यारा भाई’ असे शब्द कोरलेल्या अनेक प्रकारच्या राख्या ऑनलाईन उपलब्ध आहेत. 
मुंबई

राख्यांवरही ‘सेल्फी’च्या पसंतीची छाप 

शलाका सावंत

ठाणे : सणसमारंभांपासून सहलीपर्यंत आणि उत्सवांपासून उत्साहापर्यंत प्रत्येक क्षणाचा ‘सेल्फी’ स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात टिपण्याकडे कल वाढला आहे. ‘सेल्फी’च्या पसंतीची ही छाप आता राख्यांवरही दिसू लागली आहे. बहीण-भावाचे छायाचित्र असलेल्या राख्या आता ऑनलाईन बाजारात विक्रीस आल्या असून त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. राखीपौर्णिमेच्या राख्या सध्या ऑनलाइन बाजारात उपलब्ध होत असल्याने बाजारहाट करून राखी खरेदी करण्यापेक्षा घरबसल्या एका क्‍लिकवर राखी खरेदी करण्याकडेही ग्राहकांचा कल आहे. 

भारतीय बाजारपेठा आणि सण-उत्सव हे समीकरण हेरून आता ऑनलाईन संकेतस्थळांनीही उत्सवांसाठी लागण्याऱ्या वस्तूंची विक्री सुरू केली आहे. राखीपौर्णिमेला बहिणीकडून भावाने राखी बांधून घेण्याच्या परंपरेलाही काहीसा नवा रंग देण्याचा प्रयत्न यंदा करण्यात आला आहे. भाऊ-बहिणीच्या नात्यांतील गोड आठवणी किंवा आपल्या लाडक्‍या भावाचे छायाचित्र असलेल्या राख्या बनवून घेण्याला ग्राहक पसंती देत आहे. संकेतस्थळांबरोबरच फोटो आर्ट करणाऱ्या दुकानांमध्ये अशा राख्या तयार करून दिल्या जात आहेत. 

आधुनिक रक्षाबंधनाच्या या ट्रेण्डचा उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे. ऑनलाईन खरेदी या साध्या 
सोप्या पद्धतीमुळे उपलब्ध असलेल्या सर्वच कंपन्यांनी ई-राखी ग्रीटिंग कार्ड आणि भेटवस्तूंचे नानाविध प्रकार ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. या प्रकारात साध्या राखीपासून ते अगदी लाखो रुपयांच्या राख्यांचा आणि भेटवस्तूंचा समावेश आहे.

‘स्वॅगवाला भाई’
तरुण मंडळी नेहमीच काहीतरी नवीन करण्यासाठी उत्सुक असतात. नवी स्टाईल, नवे ढंग त्याचबरोबर नवे शब्दही ते स्वत: करतात. यो, स्वॅग, ब्रो असे काही शब्द महाविद्यालयीन तरुणांकडून आवर्जून ऐकायला मिळतात. बरेच जण की-चेन किंवा पेन्डंट म्हणूनही वापर करतात. चष्मा, मिशा, कॅमेरा, व्हिडीओ गेम यांसारख्या भाऊरायाला संबोधित करणारे चिन्ह वापरून त्यावर ‘स्वॅगवाला भाई’, ‘बडा भाई’, ‘छोटा भाई’, ‘प्यारा भाई’ असे शब्द कोरलेल्या अनेक प्रकारच्या राख्या ऑनलाईन उपलब्ध आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

Jalgaon NEET Exam : 40 अंश तापमानात ‘नीट’ परीक्षेने काढला भावी डॉक्टरांचा घाम; पालकांचीही कसोटी

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT