shop 
मुंबई

मुंबईत जूनमध्ये दुकानं उघडू शकतात पण...

नियम शिथील करण्यास पालिकेची तयारी ?

समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई: जून महिन्यापासून मुंबईतील दुकाने (shops in mumbai) सुरु ठेवण्यासाठी सम विषम पर्याय अवलंबला जाण्याची शक्‍यता आहे. महानगर पालिका (BMC) तसा विचार करत असून त्याबाबत राज्य सरकारचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. मुंबईतील कोविडचा संसर्ग नियंत्रणात आलेला असल्याने आता महानगर पालिकाही शहरातील अर्थकरण टप्प्या टप्पाने पुर्वपदावर आणण्याचा विचार करत आहे. (In month of june shops in mumbai could be open by permission of bmc)

ब्रेक द चेन अंतर्गत आलेल्या लॉकडाऊन मुळे मुंबईत अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने सकाळी 11 वाजे पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी आहे. मात्र,आता 1 जून पासून कोविड नियंत्रणात आलेल्या काही भागात लॉकडाऊन शिथील केला जाण्याची शक्‍यता आहे. असे असले तरी मुंबईतील कार्यालये उद्योगांवरील निर्बंध शिथील करताना महामुंबईतील इतर महानगर पालिका आणि नगरपालिकेतील रुग्णसंख्येचा विचार करावा लागणार आहे.

या ठिकाणी महामुंबईतून येणाऱ्या नोकरदारांची संख्या मोठी असते. त्याबाबतचा निर्णय राज्य सरकार कडून घेतला जाऊ शकतो. मात्र,मुंबईतील दुकानांचे मालक,कामगार हे त्याच परीसरातील असल्याने दुकानांवरील निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्याची तयारी महानगर पालिकेने केली आहे.याबाबत राज्य सरकारला माहिती देण्यात येणार असून राज्य सरकारने परवानगी दिल्यास शिथीलतेबाबत निर्णय घेण्यात येईल असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

समविषम तारखानुसार दुकाने सुरु ठेवण्याचा विचार महानगर पालिकेचा आहे. सम तारखांना रस्त्याच्या एकाबाजूची दुकाने आणि विषम तारखांना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूची दुकाने सुरु करण्याची परवानगी दिली जाईल, असेही सांगण्यात आले. मात्र,या फॉर्म्युलासाठी राज्य सरकारची परवानगी मिळणे आवश्‍यक आहे.

उपहारगृह,केशकर्तनालांसाठी काय निर्णय

उपहारगृह कशा प्रकारे सुरु ठेवावेत तसेच केशकर्तनाल सुरु करावेत काय नाही सुरु करायचे असल्यास कोणते नियम पाळावेत. याबाबतची नियमावली राज्य सरकारकडून ठरवली जाण्याची शक्‍यता आहे. राज्य सरकारच्या सुचनांनुसारच उपहारगृह, केशकर्तनालयांना परवानगी देण्याचा विचार महानगर पालिकेचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NHAI-Jio safety alert system: ‘हायवे’वरील धोक्यांचा इशारा आता मोबाइलवर आधीच कळणार ; 'NHAI-Jio' मध्ये करार!

मैदानी चाचणी फेब्रुवारीपासून! पोलिस भरतीत एका पदासाठी ८३ उमेदवार; इच्छुकांना रविवारपर्यंत करता येईल अर्ज; १५,६३१ पदांची भरती

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारचं मोठं विधान; कर्मचाऱ्यांची 'ही' मागणी फेटाळून लावली

Pune Voter List : मतदार यादीवर हरकत नोंदविण्यासाठी आज शेवटचा दिवस; हरकतींची संख्या १२ हजाराच्या वर!

Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या अचानक हल्ल्याने भागूबाई खोडदे यांचा बळी; पारनेर तालुक्यात भीतीचं वातावरण!

SCROLL FOR NEXT