murder File Photo murder File Photo
मुंबई

कुर्ला: टेरेसवरच्या लिफ्टमध्ये मुलीचा मृतदेह, बलात्कार करुन हत्या

इन्स्टाग्राम व्हिडीओ शूट करण्यासाठी गेलेल्या मुलाने सर्वप्रथम टेरेसवर पाहिला मृतदेह.

सुरज सावंत

मुंबई: कुर्ल्यात (Kurla) एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २० वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape) करुन तिची हत्या (Murder) करण्यात आली. कुर्ल्याच्या एचडीआयएल कंपाऊडमधील बंद इमारतीच्या टेरेसवरील लिफ्ट रुममध्ये तरुणीचा मृतदेह आढळला. ही इमारत बंद असते. एक १८ वर्षाचा मुलगा आपल्या दोन मित्रांसह (Friends) इन्स्टाग्राम व्हिडीओ शूट करण्यासाठी या इमारतीमध्ये गेला होता.

त्यावेळी सर्वप्रथम त्याने हा मृतदेह पाहिला. त्याने लगेच मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. मुलीच्या डोक्यावर गंभीर जखमा असून घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला आहे.

मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या मुलीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी सर्व पोलिस ठाण्यात बेपत्ता झालेल्या मुलीची नोंद घेण्यास सुरूवात केली आहे. या प्रकरणी विनोबा भावे पोलिस ठाण्यात अनोळखी आरोपी विरोधात बलात्कारासह हत्येचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Shiv Sena setback: पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का; २६ वर्षांतल्या ९ संपर्कप्रमुखांपैकी ५ जणांनी सोडली साथ, चौघे शिंदे गटात

Pune Nashik Railway : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवण्याचा निर्धार; जीएमआरटीकडून अडथळा नसल्याचा लोकप्रतिनिधींचा दावा

भविष्यवेध : बीएस्सी ॲग्रीकल्चर की बी. फार्मसी?

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT