मुंबई

नवजात शिशूंसाठी एनआयसीयूचे उद्‌घाटन

सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई - बेलापूर येथील अपोलो रुग्णालयाने नवजात शिशूंच्या आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी सुसज्ज व अद्ययावत असे निओनेटल इन्टेन्सिव्ह केअर युनिट (एनआयसीयू) सुरू केले आहे. नुकतेच या एनआयसीयूचे उद्‌घाटन करण्यात आले. या एनआयसीयूमध्ये सर्वाधिक जोखीम असलेल्या बाळांवर उपचार करण्यात येणार आहेत.  

जन्मत: गुंतागुंत असलेल्या इन्टेन्सिव्ह मेडिकल उपचारांची गरज असलेल्या नवजात शिशूंसाठी हे विशेष युनिट असून या एनआयसीयूमध्ये अनुभवी निओनॅटोलॉजिस्ट व पेडिट्रिॲशन्स, विशेष एनआयसीयू नर्सिंग स्टाफ, त्याचबरोबर कार्डिओलॉजिस्ट, इन्फेक्‍शन डिसिज स्पेशालिस्ट, एंडोक्रिनॉलॉजिस्ट अशा तज्ज्ञांची मल्टि-डिसिफ्लिनरी टीम असणार आहे, अशी माहिती रुग्णालयाचे पेडिट्रिक्‍स व नियोनेटॉलॉजी डॉ. अशोक गवंडी यांनी दिली.  

विविध आजारांत बालकांसाठी उपयुक्त
जन्मापासून २८ दिवसांच्या कालावधीत २६ लाख बाळांचा मृत्यू होत असल्याचे युनिसेफने एका अहवालात नमूद केले आहे. भारतात ६.५ लाख निओनेटल मृत्यू होत असल्याचेही पाहणीत आढळून आले आहे. यात ३७ आठवडे गोदर जन्म होणे, जन्मावेळी वजन कमी असणे, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, इन्फेक्‍शन, हायपोग्लायकेमिया, काविळ, फोटोथेरपीला प्रतिसाद न देणे व मृत्यूदर कमी करण्याच्या दृष्टीने एनआयसीयूची मदत होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT